शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:54 IST

एकूण ५४ जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

BJP Radhakrishna Vikhe Patil: साखर कारखान्यांच्या सभासदांना बेसल डोसचे पैसे वाटप करण्याचे कारण देत बँकेतून ८ कोटी ८६ लाखांचे कर्ज घेतले आणि ते पैसे शेतकऱ्यांना न देता त्याचा गैरवापर केला. तसंच कर्जमाफीत हे कर्ज माफ करुन घेत फसवणूक केल्याने भाजप नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे तत्कालीन संचालक, साखर आयुक्त, बँकांचे अधिकारी अशा ५४ जणांविरुद्ध लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटलं आहे की, सन २००४ मध्ये कारखान्याच्या संचालक मंडळाने बनावट कागदपत्रे करून बेसल डोस कर्जाचा प्रस्ताव तयार केला. युनियन बैंक व बैंक ऑफ इंडिया यांच्या पुणे येथील झोनल कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून अनुक्रमे ३ कोटी ११ लाख व ५ कोटी ७४ लाखांचे कर्ज मंजूर करुन घेतले. प्रत्यक्षात सभासद शेतकऱ्यांना मंजूर कर्जातील रक्कम दिली नाही. पुढे शासनाच्या कर्जमाफी योजनेत हे कर्ज माफ करुन घेत फसवणूक केली. या अपहार प्रकरणात दोन्ही बँकेचे तत्कालीन अधिकारी व सन २००४ ते २०१० दरम्यानचे कारखान्याचे संचालक मंडळ सहभागी आहे. तसेच तत्कालीन साखर आयुक्तही जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

या कारखान्याचे नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटील करतात. ते संचालक मंडळातही होते. त्यांच्यासह ५४ जणांविरुद्ध फसवणूक, कट रचणे, बनावट दस्तावेज तयार करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे. यात कारखान्याचे कार्यकारी संचालक, साखर आयुक्त यांचाही समावेश आहे.

कोणा-कोणाविरोधात गुन्हा दाखल?

अण्णासाहेब मुरलीधर कडू, अण्णासाहेब सारंगधर म्हस्के, विठ्ठल मारुतराव गायकवाड, विजय शाळीग्राम चंतुरे, रामभाऊ शंकरराव भुसाळ, गोपीनाथ गेणूजी ढमक, लक्ष्मण पुंजाजी पुलाटे, भाऊसाहेब बाबूराव घोलप, आप्पासाहेब कारभारी दिघे, कारभारी भाऊसाहेब आहेर, भास्करराव निवृत्ती खर्डे, दत्तात्रय साहेबराव खर्डे, अशोक विठ्ठल निबे, तुकाराम नामदेव बेंद्रे, सखाहरी पुंजाजी देठे, बाबासाहेब भागवत आहेर, सारंगधर नामदेव दुशिंग, दीपक गोरक्षनाथ पाटील, संपत भाऊराव चितळकर, पार्वताबाई लक्ष्मण तांबे, भामाबाई राधाकृष्ण काळे, सदाशिव कारभारी गोल्हार, प्रभाकर पांडुरंग निघुते, विठ्ठलराव गंगाधर मांढरे, बापूसाहेब बाबासाहेब घोलप, धोंडीबा विठोबा पुलाटे, गंगाबिसन भिकचंद आसावा, विश्वासराव केशवराव कडू, आबासाहेब उर्फ शशिकांत लक्ष्मण घोलप, शांतीनाथ एकनाथ आहेर, सखाहरी नाथ मगर, काशिनाथ मुरलीधर विखे, सर्जेराव सोन्याबापू खर्डे, सुभाष बाळकृष्ण खर्डे, केरुनाथ संभाजी चेचरे, काकासाहेब सोपानराव म्हस्के, बन्सी बाळू तांबे, बाबासाहेब किसन लोहाटे, सतीश शिवाजी ससाणे, बाळासाहेब बापुजी पारखे, लक्ष्मीबाई नारायण कहार, मथुराबाई सोपानराव दिघे, केशरबाई उर्फ नलिनी मोहनीराज देवकर, रामभाऊ शंकरराव भुसाळ पाटील, मुरलीधर म्हाळू पुलाटे पाटील यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा आदेशयाप्रकरणी कारखान्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रारंभी दादासाहेब पवार यांनी राज्यपालांकडे व उच्च न्यायालयात दाद मागितली होती. नंतर राहाता न्यायालयाने चौकशी करुन गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात कारखान्याने उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने राहाता न्यायालयाचा निर्णय रद्द ठरविला होता. त्याविरोधात बाळासाहेब केरु विखे व पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात अपिल केले. सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत गुन्हा नोंदवून तपास करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बाळासाहेब केरुनाथ विखे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही संदर्भ आहे

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhilyanagarअहिल्यानगरSupreme Courtसर्वोच्च न्यायालय