दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर सेनेची लघुशंका
By Admin | Updated: May 11, 2017 14:23 IST2017-05-11T14:20:28+5:302017-05-11T14:23:14+5:30
नगर शहरातील सक्कर चौकात शिवसेनेने दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर लघुशंका करत दानवेंच्या वक्तव्याचा निषेध केला.

दानवेंच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर सेनेची लघुशंका
आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ ११ - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हटल्यानंतर दानवे यांचा जिल्हाभरात ठिकठिकाणी निषेध, पुतळादहन असे आंदोलन केले जात आहे़ नगर शहरातील सक्कर चौकात शिवसेनेने दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर लघुशंका करत दानवेंच्या वक्तव्याचा निषेध केला. तसेच शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणणारे दानवे हे तालिबानी असल्याचाही उल्लेखही शिवसेनेने केला आहे़
जालना येथे बोलताना दानवे यांनी ‘तूर खरेदी केली तरी ओरडतात साले’ असे वक्तव्य केले होते़ या वक्तव्याचे नगर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले असून, दानवे यांच्याविरोधात जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने, पुतळा दहन अशी आंदोलने केली जात आहेत़ शिर्डी येथे दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले़ नगर शहरातही दानवे यांच्या पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला़