कोरोनावर मात करण्यात ज्ये‌ष्ठ नागरिक आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:45+5:302021-05-07T04:21:45+5:30

कर्जत : तालुक्यात काेराेनावर मात करण्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर आहेत. कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ९८, ...

Senior citizens lead in overcoming Corona | कोरोनावर मात करण्यात ज्ये‌ष्ठ नागरिक आघाडीवर

कोरोनावर मात करण्यात ज्ये‌ष्ठ नागरिक आघाडीवर

कर्जत : तालुक्यात काेराेनावर मात करण्यात ज्येष्ठ नागरिक आघाडीवर आहेत. कर्जत शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या ९८, ७५, ६३ वयाच्या आजीबाई ठणठणीत बऱ्या होऊन मागील काही दिवसात घरी गेल्या आहेत.

एकीकडे कोरोनाची वाढती आकडेवारी ही अनेकांच्या मनात भीतीचे व नकारात्मक वातावरण निर्माण करीत आहे. कोरोनावर विजय हा मिळवताच येतो हे कोरोनातून बऱ्या झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींच्या उदाहरणातून समोर येत आहे. तालुक्यातील रुग्णालयांमध्ये उपचार घेऊन ९८, ७५, ६३ वयाच्या घरातील महिला या ठणठणीत बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. शासकीय अधिकारी व आरोग्य यंत्रणा प्रत्येक रुग्ण हा लवकरात लवकर बरा होऊन घरी जावा यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत.

बहिरोबावाडी येथील ९८ वर्षीय काशीबाई यशवंत तोरडमल यांनी केवळ प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर उपजिल्हा रुग्णालय येथे आठ ते दहा दिवस उपचार घेऊन बरे होत कोरोनावर मात केली. भांबोरा गावच्या ७५ वर्षीय पुष्पा आजिनाथ बेद्रे यांच्यावर वर्षभरापूर्वीच अँजिओप्लास्टी झाली होती. काही दिवसापूर्वी शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे त्यांना रक्तही देण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांनी पुष्पा बेद्रे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मात्र उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या प्रकारे उपचार घेऊन बरे होण्याचा आत्मविश्वास ठेवलेल्या पुष्पा बेद्रे या पाच दिवसांनी कोरोनामुक्त होऊन घरी परतल्या.

--

कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत. ही खूप समाधानकारक बाब आहे. मात्र त्याहूनही शंभरीच्या घरातील वयोवृद्धही कोरोनावर विजय मिळवीत आहेत. ही बाब आपल्या प्रत्येकासाठी आदर्शवत उदाहरणच म्हणावे लागेल. कोरोनाचा संसर्ग झाला तरी डगमगून न जाता वैद्यकीय उपचारांची साथ व सकारात्मक विचार मनात ठेवत नेटाने सामना केल्यास नक्कीच आपण कोरोनामुक्त होऊ शकतो, हे यातून दिसून येते.

- रोहित पवार,

सदस्य, कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ

Web Title: Senior citizens lead in overcoming Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.