मंजुषा गुंड यांचे ‘सेल्फी विथ खड्डा’ : पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 12:51 IST2018-09-13T12:09:04+5:302018-09-13T12:51:48+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी  अहमदनगर-सोलापूर  महामार्गावरील  रस्त्यावरील खड्ड्यात सेल्फी काढत रस्त्याच्या दुरावस्था दाखविली.

'Selfie With Khadda', Manjusha Gund: Targeting Guardian Minister Ram Shinde | मंजुषा गुंड यांचे ‘सेल्फी विथ खड्डा’ : पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा 

मंजुषा गुंड यांचे ‘सेल्फी विथ खड्डा’ : पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा 

माहीजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा गुंड यांनी  अहमदनगर-सोलापूर  महामार्गावरील  रस्त्यावरील खड्ड्यात सेल्फी काढत रस्त्याच्या दुरावस्था दाखविली. हा फोटो सोशल मीडियावर टाकत पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. हा रस्ता पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातील आहे. त्यामुळे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न प्रवाशाना पडतोय, असेही गुंड यांनी म्हटले आहे. 
गुंड यांनी  पालकमंत्र्यांवर खड्ड्यांच्या माध्यमातून निशाणा साधल्याने ही पुढील राजकारणाची नांदी ठरत असल्याचे दिसत आहे. २०१९ च्या निवडणुकीसाठी गुंड अधिक आक्रमक होऊ लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाल  संपताच त्यांची जिल्हाध्यक्ष पदी वर्णी लागली जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेताच त्यांनी पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रम घेतले. कर्जत तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली हा प्रश्न जिव्हाळ्याचा प्रश्न मांडल्याची प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या. 
 

 

Web Title: 'Selfie With Khadda', Manjusha Gund: Targeting Guardian Minister Ram Shinde