आनंद महाविद्यालयाच्या तिघांची प्राध्यापकपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST2021-01-23T04:20:25+5:302021-01-23T04:20:25+5:30

पाथर्डी : श्री आनंद महाविद्यालयातील डॉ. मुक्तार शेख, डॉ. जगन्नाथ बरशिले, डॉ. अनिल गंभीरे यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ...

Selection of three as professors of Anand College | आनंद महाविद्यालयाच्या तिघांची प्राध्यापकपदी निवड

आनंद महाविद्यालयाच्या तिघांची प्राध्यापकपदी निवड

पाथर्डी : श्री आनंद महाविद्यालयातील डॉ. मुक्तार शेख, डॉ. जगन्नाथ बरशिले, डॉ. अनिल गंभीरे यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठाने प्राध्यापकपदी निवड केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नुकत्याच प्राध्यापकपदाच्या मुलाखती पार पडल्या. या मुलाखतीमध्ये त्यांची निवड करण्यात आली. कुलगुरूंचे प्रतिनिधी म्हणून डॉ. एस. आय. पाटील, डॉ. आर. जी. परदेशी, डॉ. मनोधर जाधव, डॉ. सजीव सोनवणे, संस्था प्रतिनिधी म्हणून प्रा. अशोक दौंड आदी उपस्थित होते. त्यांचा संस्थेचे सचिव सतीश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया यांनी सत्कार केला. तिलोक जैन विद्यालयात प्राचार्य अशोक दौंड यांच्या हस्ते डॉ. शेख, बरशिले व डॉ. गंभीरे यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. दत्ताराम बांगर यांनी केले. फोटो : २२ पाथर्डी

Web Title: Selection of three as professors of Anand College