प्रशांत पाटील यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:22+5:302021-02-06T04:37:22+5:30
पाटील यांनी ‘कृषी यंत्राच्या सहाय्याने वीज निर्मिती’ हा प्रकल्प सादर करून जागतिक संशोधन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. तसेच ...

प्रशांत पाटील यांची निवड
पाटील यांनी ‘कृषी यंत्राच्या सहाय्याने वीज निर्मिती’ हा प्रकल्प सादर करून जागतिक संशोधन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला होता. तसेच त्यांच्या या यंत्राची रशियात होणाऱ्या प्रदर्शनात सादरीकरणासाठी देखील निवड झाली आहे. त्यांच्या या संशोधन कार्याची दाखल घेत पंतप्रधान आणि राष्ट्रपती कार्यालयाच्या वतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.
पाटील यांच्या वीजनिर्मिती यंत्राचा आणि त्यांच्यातील संशोधनवृत्तीचा समाजासाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि पर्यावरण मंत्रालयाने त्यांची कनिष्ठ शास्रज्ञ म्हणून पुढील आठ वर्षांसाठी निवड केली आहे. या काळात त्यांना दरमहा मानधनही देण्यात येणार असल्याचे मंत्रालयामार्फत पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ, कार्यकारी विश्वस्त राहुल गुंजाळ, मुख्याधिकारी सोनल गुंजाळ, कॉलेजच्या शिक्षण विभागप्रमुख डॉ. पूनम ढगे आदी कौतुक केले आहे.
---------
फोटो नेम : ०५प्रशांत पाटील