ओंकार जाधव यांची ‘रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन साठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST2021-09-05T04:25:04+5:302021-09-05T04:25:04+5:30
संगमनेर : अभियंता ओंकार प्रताप जाधव यांची टीसीएस कंपनीत ‘रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन’ साठी निवड झाली आहे. ओंकार जाधव यांनी ...

ओंकार जाधव यांची ‘रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन साठी निवड
संगमनेर : अभियंता ओंकार प्रताप जाधव यांची टीसीएस कंपनीत ‘रिसर्च ॲण्ड इनोव्हेशन’ साठी निवड झाली आहे. ओंकार जाधव यांनी शालेय शिक्षण येथील सह्याद्री विद्यालयात, महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील बालवडकर महाविद्यालयात तर अभियांत्रिकीचे शिक्षण अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केले आहे.
अभियांत्रिकीचे (एम.टेक. इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग) उच्च शिक्षण आयआयटी, गांधीनगर, अहमदाबाद (गुजरात) येथून नुकतेच पूर्ण केले. टीसीएस कंपनीच्या वतीने गांधीनगर येथे कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यात निवडक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्या निवडीचे अनेकांनी कौतुक केले. संगमनेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता प्रताप जाधव यांचे ते चिरंजीव आहेत.