प्रवरा पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे तीन वाहने पकडले; ९ लाखांचा ऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:12 IST2020-06-19T18:12:17+5:302020-06-19T18:12:39+5:30
नेवासा तालुक्यातील खलाळपिंप्री शिवारातील प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करीत असलेले दोन टेम्पो व एक ढंपर नेवासा पोलिसांनी पकडला. यामध्ये सहा ब्रास वाळूसह नऊ लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्रवरा पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे तीन वाहने पकडले; ९ लाखांचा ऐवज जप्त
नेवासा : तालुक्यातील खलाळपिंप्री शिवारातील प्रवरा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करीत असलेले दोन टेम्पो व एक ढंपर नेवासा पोलिसांनी पकडला. यामध्ये सहा ब्रास वाळूसह नऊ लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुरुवारी (दि.१८ जून) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खलाळपिंप्री शिवारात प्रवरा नदीपात्रात अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना समजली. यावेळी त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी पोलीस पथकासह जाऊन ही कारवाई केली.
एक ढंपर व दोन टेम्पो थांबवून पोलिसांनी तपासणी केली. त्यात वाळू मिळून आली. परवाण्याबाबत चौकशी केली असता कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. यामध्ये तीन ब्रास वाळूसह ढंपर (क्र.एम.एच.३१क्यू. २८५८), दोन ब्रास वाळूसह अशायर टेम्पो (नंबर नाही), एक ब्रास वाळूसह टेम्पो (क्र.एम.एच.-१६ ए.डी.२३९८) असा सहा ब्रास वाळूसह नऊ लाख तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.