पुणे बायपास चौकात सुरक्षेच्या उपाययोजना

By Admin | Updated: February 17, 2016 22:42 IST2016-02-17T22:37:00+5:302016-02-17T22:42:08+5:30

अहमदनगर : वाहतूक सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना न केल्याने अपघातप्रवण क्षेत्र बनलेल्या केडगाव बायपास चौकात येत्या आठ दिवसांत इंडियन रोड कॉँग्रेसच्या मानकांप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येईल,

Security measures at Pune Bypass Chowk | पुणे बायपास चौकात सुरक्षेच्या उपाययोजना

पुणे बायपास चौकात सुरक्षेच्या उपाययोजना

अहमदनगर : वाहतूक सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना न केल्याने अपघातप्रवण क्षेत्र बनलेल्या केडगाव बायपास चौकात येत्या आठ दिवसांत इंडियन रोड कॉँग्रेसच्या मानकांप्रमाणे आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येईल, असे लेखी पत्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिले.
बाह्यवळण रस्त्यावरील केडगावजवळ पुणे-नगर महामार्गाला जोडणाऱ्या चौकात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वर्दळ असलेल्या या चौकात वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनाच नाहीत. आमदार संग्राम जगताप यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बुधवारी चर्चा केली. अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जात जगताप यांनी चौकात इंडियन रोड कॉँग्रेसच्या मानकांनुसार उपाययोजना करण्याची सूचना केली. आठ दिवसांत उपाययोजना केल्या जातील असे लेखी आश्वान बांधकाम अधिकाऱ्यांनी दिले.
(प्रतिनिधी)

Web Title: Security measures at Pune Bypass Chowk