आठवडाभराने  शाळेला दुस-यांदा कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 17:43 IST2017-08-31T17:43:13+5:302017-08-31T17:43:56+5:30

कोतूळ : ‘सरकारी काम अन् महिनाभर थांब’ हा अनुभव अकोले तालुक्यातील केळी बांगरवाडी येथील नागरिकांना आल्याने त्यांनी पुन्हा गुरूवारी ...

For the second time the school lockup for the second time | आठवडाभराने  शाळेला दुस-यांदा कुलूप

आठवडाभराने  शाळेला दुस-यांदा कुलूप

ठळक मुद्देपुन्हा ‘तोच’ शिक्षक नेमला केळी बांगरवाडी जिल्हा परिषद शाळा

कोतूळ : ‘सरकारी काम अन् महिनाभर थांब’ हा अनुभव अकोले तालुक्यातील केळी बांगरवाडी येथील नागरिकांना आल्याने त्यांनी पुन्हा गुरूवारी शाळेला टाळे ठोकले आहे. मात्र जोपर्यंत नवीन शिक्षक येत नाही, तोपर्यंत विद्यार्थी शाळेत पाठवणार नाही, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. 
मागील दीड वर्र्षींपासून केळी बांगरवाडी येथील जिल्हा परिषद शिक्षक बाबूराव वसंत देशमुख यांच्या करामतीस कंटाळून त्यांच्या बदलीसाठी बांगरवाडी येथील ग्रामस्थ व पालकांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, अधिका-यांचे उंबरे झिजवले. पंधरा आॅगस्टच्या ग्रामसभेत या शिक्षकाची बदली करण्याचा ठराव झाला. वर्षभरात सर्व विभागांना निवेदने देण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य किरण लहामटे यांनी देखील शिक्षण विभागाची याप्रकरणी झाडाझडती झाली. 
............................................
पुन्हा त्याच शिक्षकाची नियुक्ती
मागील आठवड्यातही याप्रकरणी शाळेला टाळे ठोकण्यात आले होते. मात्र तरीही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शिक्षकास पुन्हा याच शाळेवर हजर होण्यासाठी आदेश दिल्याने ग्रामस्थांनी गुरूवारी शाळेला पुन्हा कुलूप ठोकले आहे. नवीन कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही तोपर्यंत, एकही विद्यार्थी शाळेत न  पाठविण्याचाही निर्धार पालकांनी केला आहे. यावेळी सरपंच भीमा गोडे , शाळा समिती अध्यक्ष संतोष गोडे , मारूती गोडे, शंकर तळपा , अंजना बांगर, विजय बांगर, जिजाबा गोडे, कोंडीबा गोडे, कमलेश वाघमारे, संजय गोडे उपस्थित होते. तर विद्यार्थी दिवसभर शाळेच्या व्हरांडयात बसून होते. 
 

Web Title: For the second time the school lockup for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.