वनविभागाला लागेना चंदन तस्करांचा शोध
By Admin | Updated: April 26, 2017 20:05 IST2017-04-26T20:05:11+5:302017-04-26T20:05:11+5:30
वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या येथील मुख्य कार्यालयातूनच चंदनाच्या झाडांची तस्करी झाली़

वनविभागाला लागेना चंदन तस्करांचा शोध
अ मदनगर : वृक्षरोपण करून पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी असलेल्या वनविभागाच्या येथील मुख्य कार्यालयातूनच चंदनाच्या झाडांची तस्करी झाली़ या घटनेला तीन महिने उलटूनही या चोरट्यांचा तपास वनविभागाला अद्यापपर्यंत लावता आलेला नाही़ वरिष्ठ अधिकाºयांनी या चंदन तस्करीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे़ शहरातील औरंगाबाद रोडवरील वनविभागाच्या कार्यालय १ जानेवारी रोजी दहा ते बारा जणांनी प्रवेश करत रात्रपाळीला असलेल्या वनकर्मचाºयांच्या मानेवर सुरा व करवत ठेवून पाच चंदनाची झाडे तोडून नेली़ कत्तल केलेल्या झाडांचे करवतीच्या सहाय्याने तुकडे करून चंदनतस्करांनी पलायन केले़ वनविभाग परिसरातून या आधीही अनेकवेळा चंदनाच्या झाडांची चोरी झालेली आहे़ वनक्षेत्रात प्राणी, पशू हत्या व झाडांची कत्तल झाली तर वनविभागातच त्या गुन्ह्याची नोंद करून तेथील अधिकारी तपास करतात़ येथील वनकार्यालय परिसरातून झालेली चंदन तस्करी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून चव्हाट्यावर आणल्यानंतर वनविभागातील कर्मचाºयांनी हालचाल सुरू केली़ गेल्या साडेतीन महिन्यात संशयीत आरोपींची चौकशी करण्यापलिकडे तपासी अधिकाºयांच्या हाताला काहीच लागले नाही़ त्यामुळे स्वत:चे कार्यालय संभाळू न शकणारा वनविभाग जिल्ह्यातील वनक्षेत्राचे कसे संरक्षण करणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे़