भविष्याचा वेध घेऊन शास्त्रज्ञांनी कार्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:17 IST2021-04-03T04:17:08+5:302021-04-03T04:17:08+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रा. ...

भविष्याचा वेध घेऊन शास्त्रज्ञांनी कार्य करावे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य प्रा. नाथाजी चौगुले, सुनीता पाटील, डॉ. पंकजकुमार महाले, डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, कुलसचिव मोहन वाघ, नियंत्रक विजय कोते, मिलिंद ढोके उपस्थित होते.
पुरी म्हणाले, पंतप्रधानांच्या पाण्याचा प्रतिथेंब जास्त उत्पादन तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, यासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमाला सिद्धीस जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आजच्या काळात सेंद्रिय शेती तसेच तापमानवाढ सहन करणारे पिकांचे उन्नत वाण संशोधित करण्याची गरज आहे. पॉलीस हाउसमधील लागवडीसाठी लागणाऱ्या गुलाब फुलाचे उन्नत वाण संशोधित केल्यास शेतकऱ्यांना यासाठी परदेशातून आयात करण्यासाठी लागणारा पैसा आणि वेळ आपण वाचवू शकू. कृषी विज्ञान केंद्रांनी थोड्या अंतरावरील क्षेत्र मर्यादित न ठेवता पूर्ण जिल्ह्यात कार्य करणे गरजेचे आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रात येणाऱ्या संलग्न महाविद्यालयांची घडी बसविणे गरजेचे आहे. संलग्न महाविद्यालयांची संख्या वाढल्यामुळे विद्यापीठस्तरावर त्यासाठी लागणारा वेगळा परीक्षा कक्ष मनुष्यबळासह निर्माण करणे काळाची गरज आहे.
कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील म्हणाले, विद्यापीठाच्या गत वर्षात झालेल्या ठळक घडामोडींचा आढावा मागोवा कार्यक्रमात घेण्यात येतो. परंतु, यापुढे वेध भविष्याचा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करून शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या पुढील पाच वर्षांचा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न राहील. आगामी काळात विविध पिकांच्या वाणांत पोषक अन्नद्रव्यांचा समावेश कसा करता येईल, याकडे लक्ष दिले जाईल.