टाकळीभानमधील शाळा सोमवारपासून सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:28+5:302021-07-21T04:15:28+5:30
ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी आरोग्य विभाग, मुख्याध्यापक व प्रमुख नागरिकांची बैठक ग्रामसचिवालयात आयोजित केली होती. बैठकीत उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी, ...

टाकळीभानमधील शाळा सोमवारपासून सुरू
ग्रामपंचायत प्रशासनाने सोमवारी आरोग्य विभाग, मुख्याध्यापक व प्रमुख नागरिकांची बैठक ग्रामसचिवालयात आयोजित केली होती. बैठकीत उपसरपंच कान्होबा खंडागळे यांनी, कोरोनाचा फैलाव होऊ नये व खबरदारी म्हणून कोरोना नियमांचे काटेकोर पालन केले जावे, शाळांनी कोरोना फैलाव रोखण्यासाठी दक्षता घ्यावी, तसेच ग्रामपंचायत सहकार्य करण्यास तयार आसल्याचे सांगितले.
बैठकीत सर्व वर्गखोल्या सॅनिटाइझ करणे, प्रत्येक विद्यार्थ्याने मास्कचा वापर करणे, एका बेंचवर एकच विद्यार्थी, प्रवेश देताना विद्यार्थ्यांची थर्मल चेकिंग करणे, सर्व शिक्षकांनी लसीकरण करून घेणे आदी प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. या मुद्द्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याने अखेर शनिवारपर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून सोमवारपासून शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपसरपंच कान्होबा खंडागळे, यशवंत रणनवरे, सदस्य सुनील बोडखे, दीपक कोकणे, कामगार तलाठी अरुण हिवाळे, अशोकचे संचालक दत्तात्रय नाईक, ग्रामविकास अधिकारी रामदास जाधव, आरोग्य केंद्राचे एन. ए. शेख, बी. एस. चांदने उपस्थित होते.