शाळकरी मुलगी टँकरखाली ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 12:49 IST2017-09-09T12:46:49+5:302017-09-09T12:49:59+5:30
कोपरगाव : वैष्णवी भगवान देवकर ही शाळकरी मुलगी टँकरखाली सापडून जागीच ठार झाली. शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

शाळकरी मुलगी टँकरखाली ठार
कोपरगाव : वैष्णवी भगवान देवकर ही शाळकरी मुलगी टँकरखाली सापडून जागीच ठार झाली.
शनिवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. कोपरगावच्या कन्या शाळेत ती आठवीच्या वर्गात शिकत होती. टाकळी शिवारातील दत्तवारी येथील सात चारी परिसरात ती राहत होती. तेथून ती सायकलने शाळेत जात असतानाच टँकरने समोरून दिलेल्या धडकेने ती ठार झाली.साई कॉर्नरवरच्या खडकी रस्त्यावरील भारत गॅससमोर ही दुर्घटना घडली. कोपरगावच्या संधू ट्रान्सपोर्टचा हा टँकर (क्रमांक एम. एच. २६/ए.डी. १६२९) आहे. मुलीचे आई वडिल हरिद्वार येथे देवदर्शनासाठी गेलेले आहेत. पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर पोलीस ठाण्यात आणला आहे. सकाळी ११.३० वाजेपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता. बाल्या बारहाते (रा.सात चारी, दत्तवाडी, टाकळी, कोपरगाव) हा चालक टँकर चालवित होता.