शिष्यवृत्ती पुन्हा पुढे ढकलली, आता ९ ॲागस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:15+5:302021-07-28T04:22:15+5:30
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शालेय स्तरावर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ...

शिष्यवृत्ती पुन्हा पुढे ढकलली, आता ९ ॲागस्टला
दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शालेय स्तरावर उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८वी) आयोजित केली जाते. यंदा २३ मे रोजी ही परीक्षा होणार होती. त्यासाठी जिल्ह्यात ३६८ केंद्रांची निश्चिती करून परीक्षेची तयारीही झाली होती. परंतु, कोरोनामुळे शासनाने ही परीक्षा पुढे ढकलली. पुढे कोरोनाची स्थिती काहीशी निवळल्यानंतर ८ ॲागस्ट रोजी ही परीक्षा होत असल्याचे परीक्षा परिषदेने जाहीर केले.
परंतु, आता पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलली आहे. ८ ॲागस्ट रोजी नगर जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म पोलीस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा होत आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऐवजी ९ ॲागस्टला होणार आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र २७ जुलैला संबंधित शाळांच्या लाॅगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे, असे परीक्षा परिषदेने कळवले आहे.
दरम्यान, या शिष्यवृत्तीसाठी नगर जिल्ह्यातून २०१९ शाळांच्या ४७ हजार ७६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यात ३० हजार ११५ पाचवीचे विद्यार्थी, तर १६ हजार ९६१ आठवीचे विद्यार्थी आहेत.