चिनी मांजापासून नगरकरांचा जीव वाचवा, पतंग उडवताना चायना मांजा दिसला तरी कारवाई होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST2021-01-14T04:17:19+5:302021-01-14T04:17:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नागपूर येथे चायना मांज्यामुळे गळा कापल्याने तरुणाचा अंत झाला. या पार्श्वभूमीवर नगर शहरातही पोलीस, ...

Save the lives of city dwellers from Chinese cats, action will be taken even if China cats are seen flying kites | चिनी मांजापासून नगरकरांचा जीव वाचवा, पतंग उडवताना चायना मांजा दिसला तरी कारवाई होणार

चिनी मांजापासून नगरकरांचा जीव वाचवा, पतंग उडवताना चायना मांजा दिसला तरी कारवाई होणार

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : नागपूर येथे चायना मांज्यामुळे गळा कापल्याने तरुणाचा अंत झाला. या पार्श्वभूमीवर नगर शहरातही पोलीस, वन विभाग आणि महापालिका यांच्याकडून कारवाई सुरू झाली आहे. चायना मांजाची विक्री करताना विक्रेता आढळल्यास कारवाई होणारच आहे, मात्र पतंग उडवताना कोणाच्या हातात चायना मांजा दिसला तर त्याच्यावरही थेट गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यासाठी वन विभाग, पोलीस आणि महापालिकेची पथके तैनात करण्यात आली असून, त्यांची शहरात दोन दिवस गस्त राहणार आहे.

नगर शहरात मोठ्या प्रमाणावर चायना मांज्याची विक्री जोरात सुरू आहे. गेल्या आठ दिवसात तीन पक्षी या मांजामुळे जखमी झाल्याचे आढळले आहे. त्यामध्ये चिचुंद्री, घुबड या पक्ष्यांचा समावेश आहे. याशिवाय अनेक दुचाकींमध्येही मांजा अडकल्याचे प्रकार घडत आहेत.

वन विभागाने मंगळवारी चायना मांजा विकणाऱ्या पाच दुकानांवर कारवाई केली. यावेळी १४१ मांजा चक्री जप्त करण्यात आल्या. मात्र, वन विभागाकडे कर्मचारी संख्या कमी असल्याने सलग दोन दिवस त्यांच्याकडून कारवाई होईल की नाही, याबाबत शंका आहे. त्यामुळे पोलीस आणि महापालिका प्रशासनावरच आता या कारवाईची भिस्त राहणार आहे. शहरात मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने चायना मांजाची विक्री सुरू आहे. त्यामुळे पोलिसांची पथकेही तैनात करण्यात आली असून, महापालिका प्रशासनही कारवाई करणार आहे.

-------------

अशी होईल कारवाई

पतंग विक्रेत्यांकडे चिनी मांजा आढळून आल्यास गुन्हा

पतंग उडवताना चिनी मांजा आढळून आल्यासही गुन्हा

एकत्रित पतंग उडवणाऱ्यांवरही कारवाई

साहित्य जप्त केले जाणार

--------------

पालकांनीही घ्यावी दक्षता

पतंग उडविण्यासाठी साधा दोरा द्यावा

चायना मांजा असल्यास काढून घ्यावा

दोऱ्याची लांबी कमी द्यावी

घराच्या छतावरच गर्दी करू देऊ नये

मोकळ्या मैदानात पतंग उडवावा

----------------------

दोन दिवस सतर्कता

बुधवार आणि गुरुवार असे दोन्ही दिवस प्रशासनाने दक्षता घेतली असून, चिनी मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पथके तैनात केली आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या या कारवाईचे पक्षीमित्र, पर्यावरणमित्रांनीही स्वागत केले आहे.

Web Title: Save the lives of city dwellers from Chinese cats, action will be taken even if China cats are seen flying kites