किसान संघर्ष समितीचा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:02+5:302021-02-05T06:42:02+5:30

अहमदनगर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने महात्मा गांधी ...

Satyagraha of Kisan Sangharsh Samiti in front of Gandhiji's statue | किसान संघर्ष समितीचा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह

किसान संघर्ष समितीचा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह

अहमदनगर : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र, अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी, हुतात्मा दिनानिमित्त शनिवारी वाडियापार्क क्रीडा संकुल येथील त्यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. केंद्र सरकार शेतकरी आंदोलनास बदनाम करून आंदोलन दडपून टाकत असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला.

शेतकरी नेत्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, तीन अन्यायकारक शेतकरी विरोधी कृषी कायदे व कामगार विरोधी चार संहिता रद्द करा या मागण्या घेऊन शेतकरी आंदोलनास नैतिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारच्या विरोधात हुतात्मा दिन केंद्र सरकारचा निषेध दिन म्हणून पाळण्यात आला. महात्मा गांधींजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या सत्याग्रहाची सुरुवात करण्यात आली.

यामध्ये कॉम्रेड सुभाष लांडे, अविनाश घुले, बन्सी सातपुते, महेबुब सय्यद, कॉम्रेड सुधीर टोकेकर, भैरवनाथ वाकळे, अर्शद शेख, अंबादास दौंड, रामदास वागस्कर, प्रशांत पाटील, भाऊसाहेब थोटे, अब्दुल गणी शेख, संध्या मेढे, बाळासाहेब भुजबळ, फिरोज खान, मार्गारेट जाधव, श्यामराव वाघस्कर, दिपक शिरसाठ, कान्हू सुंबे, बाळासाहेब सागडे, वैभव कदम आदी सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांच्या दिल्ली येथील आंदोलनाची दखल न घेता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध केला. तसेच शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात विविध राजकीय पक्ष व स्वयंसेवी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला.

-----------

३० किसान संघर्ष समिती

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा शाखेच्यावतीने वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला. या आंदोलनात सुभाष लांडे, अविनाश घुले, बन्सी सातपुते, महेबूब सय्यद, सुधीर टोकेकर, भैरवनाथ वाकळे, अर्शद शेख आदी सहभागी झाले होते.

Web Title: Satyagraha of Kisan Sangharsh Samiti in front of Gandhiji's statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.