शनिवारी ठरणार सासू-सून जोडी नंबर वन
By Admin | Updated: June 26, 2014 00:45 IST2014-06-25T23:49:03+5:302014-06-26T00:45:00+5:30
लोकमत सखी मंच: अभिनेत्री ॠजुता देशमुख यांची उपस्थिती
शनिवारी ठरणार सासू-सून जोडी नंबर वन
अहमदनगर : लोकमत सखी मंच आयोजित, वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रायोजित व पॉवर्ड बाय साईदिप ग्रुप, ‘‘सासू-सून जोडी नं. १’’ या कार्यक्रमाअंतर्गत शनिवारी सासू-सून जोडी नं. १ हे ठरणार आहे. शनिवार दि. २८ जून २०१४ रोजी सायंकाळी ५ वाजता नंदनवन लॉन, हॉटेल पॅराडाईजजवळ, न्यू टिळक रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाकरिता प्रवेश मर्यादित असून, महिलांनी दि. २७ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी.
प्रश्न हा अनंतकाळचा, कोण सरस, सासू की सून? ... सोडून चर्चा सारी... करुया जोडी... घेऊ जग जिंकून असे म्हणत ‘सासू-सूनेची जोडी नं. १’ या आगळ्या वेगळ्या स्पर्धेला सासू-सून जोड्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही आगळी वेगळी स्पर्धा सर्व महिलांकरीता आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा सर्व महिलांकरिता खुली असून स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता सासू-सूनेची जोडी असणे आवश्यक आहे. या मनोरंजनात्मक स्पर्धेत परिचय फेरी आणि एक मिनीट गेम शो अशा फेऱ्या होणार आहेत. स्वपरिचय फेरीमध्ये सासूने सूनेचा व सूनेने सासूचा परिचय प्रत्येकी एक मिनीटात करुन द्यायचा आहे. तसेच या फेरीसाठी दोघींनी मॅचिंग वेशभूषा करावी. गेम शो फेरीमध्ये दोघींनी मिळून गेम्स खेळावयाचे आहेत.
विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धेत भाग घेण्याकरिता लोकमत भवन, सावेडी रोड येथे ९८५०२६४२००, २४२९९०२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
या कार्यक्रमाकरिता वामन हरी पेठे ज्वेलर्स हे मुख्य प्रायोजक असून साईदिप ग्रुप यांचे सौजन्य या कार्यक्रमाकरिता मिळाले.
(प्रतिनिधी)
अशी आहे स्पर्धा....
स्पर्धा सर्व महिलांकरिता खुली असून स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता सासू-सूनेची जोडी असणे आवश्यक आहे. या मनोरंजनात्मक स्पर्धेत परिचय फेरी आणि एक मिनीट गेम शो अशा फेऱ्या होणार आहेत.