अहमदनगर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सरला बार्नबस यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:18 IST2019-08-28T16:14:52+5:302019-08-28T16:18:40+5:30
अहमदनगर महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्या व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सरला बार्नबस (वय ८४ वर्षे) यांचे आज सकाळी खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

अहमदनगर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सरला बार्नबस यांचे निधन
अहमदनगर : अहमदनगर महाविद्यालयाच्या निवृत्त उपप्राचार्या व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. सरला बार्नबस (वय ८४ वर्षे) यांचे आज सकाळी खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.
डॉ. सरला बार्नबस या अहमदनगर महाविद्यालयाच्या संस्थापक डॉ. भास्कर हिवाळे यांच्या कनिष्ठ कन्या होत्या. हार्वर्ड विश्वविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असून इंग्रजी साहित्यातून विद्या वाचस्पती पदवी मिळविली होती. त्यांच्या अनेक इंग्रजी कादंब-या प्रसिद्ध झाल्या असून त्यातील काही मराठी, हिंदी व फ्रेंच या भाषांमध्ये भाषांतरित झाल्या आहेत. त्यांच्या मागे मुलगा प्राचार्य डॉ. रजनीश बार्नबस, मुलगी डॉ. नंदिता बार्नबस, सून व नातवंडे असा परिवार आहे.