सराईत चंदन चोर सोनई पोलिसांकडून जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 14:54 IST2018-08-30T14:54:47+5:302018-08-30T14:54:56+5:30

तालुक्यातील लोहगाव रोड वर सापळा रचून सराईत चंदन चोर शरद कुंडलिक माळी, किसन वसंत शिंदे यांना सोनई पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

Sarait Chandan Chor Soni Police's Jirband | सराईत चंदन चोर सोनई पोलिसांकडून जेरबंद

सराईत चंदन चोर सोनई पोलिसांकडून जेरबंद

नेवासा : तालुक्यातील लोहगाव रोड वर सापळा रचून सराईत चंदन चोर शरद कुंडलिक माळी, किसन वसंत शिंदे यांना सोनई पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की सोनई येथील चंदन चोर व रेकोर्ड वरील गुन्हेगार शरद कुंडलिक माळी, किसन वसंत शिंदे लोहगाव रोड पांजरपोळ परिसरात असल्याची गोपनीय माहिती सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने यांना मिळाल्यानंतर त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक ससाणे,दत्ता गावडे, शिवाजी माने,श्री.आव्हाड,श्री.चव्हाण,किरण गायकवाड, काका मोरे,अमोल भांड,सचिन ठोंबरे, संदीप गुसिंगे,बाबा वाघमोडे,अमोल जवरे,बापूसाहेब राठोड,विशाल थोरात यांनी पांजरपोळ परिसरात पाठलाग करून ताब्यात घेतले.त्यांच्या विरोधात सोनई पोलीसात दाखल असलेल्या ३७९,५११,३४ या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सोनई पोलिसांच्या कारवाईने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title: Sarait Chandan Chor Soni Police's Jirband