सराईत गुन्हेगारास अटक करून चार मोटारसायकली हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:15 IST2021-06-10T04:15:24+5:302021-06-10T04:15:24+5:30
नेवासा : नगर-औरंगाबाद रस्त्यावर धाक दाखवून रस्तालूट करीत असलेला व मोटारसायकल चोरी प्रकरणात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास शनिशिंगणापूर (ता.नेवासा) ...

सराईत गुन्हेगारास अटक करून चार मोटारसायकली हस्तगत
नेवासा : नगर-औरंगाबाद रस्त्यावर धाक दाखवून रस्तालूट करीत असलेला व मोटारसायकल चोरी प्रकरणात फरार असलेल्या सराईत गुन्हेगारास शनिशिंगणापूर (ता.नेवासा) पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या चार मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.
नगर-औरंगाबाद रस्त्यावरील कांगोणी फाटा येथे २ फेब्रुवारी २०२१ रोजी रवींद्र राजेंद्र कदम (वय २५) राहणार-चांदा यांची मोटारसायकल अडवून रोकड साडेतेरा हजार, पंधरा हजारांचा मोबाइल व दोन तोळ्यांची सोन्याची चेन, असा ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटण्यात आला होता. घटनेनंतर नितीन मोहन राशीनकर यास अटक करण्यात आली होती. मात्र, रस्तालूट गुन्ह्यातील दुसरा आरोपी नामदेव उत्तम मोहिते फरार होता.
गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल व पथकाने म्हाळस पिंपळगाव येथे छापा टाकून त्यास अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून सोनई हद्दीतून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागूल, सहायक फौजदार पोपट कटारे, हवालदार ज्ञानेश्वर माळवे, बडे, शिंदे, फुलमाळी, शेख, गोरे यांनी कारवाई केली.
090621\img-20210608-wa0054.jpg
?????? : ???????? ? ?????????? ??????? ??????? ???????????? ????????? ???