पुनर्विवाह केल्याने सरपंच पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारला

By Admin | Updated: April 28, 2017 16:30 IST2017-04-28T16:30:59+5:302017-04-28T16:30:59+5:30

सुगाव खुर्द येथे पुनर्विवाह केल्यामुळे थेट सरपंच पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे़

Saracanch wife refused to enter the temple after remarriage | पुनर्विवाह केल्याने सरपंच पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारला

पुनर्विवाह केल्याने सरपंच पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारला

आॅनलाइन लोकमत
अकोले (अहमदनगर), दि़ २८ - तालुक्यातील सुगाव खुर्द येथे पुनर्विवाह केल्यामुळे थेट सरपंच पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे़ यात समन्वय काढण्यासाठी गावाने समिती नेमली आहे़
सुगाव खुर्द येथे पुनर्विवाह केलेल्या महिलेला मंदिर प्रवेश बंदी व पुजेचा मान नाकारल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. २४ एप्रिल रोजी सुगाव खुर्द येथील काशाई देवीच्या यात्रेत पुजा करण्याच्या कारणावरुन गावातील काही वयोवृध्दांनी सरपंच महेश वैद्य यांच्या पत्नी निर्मला वैद्य यांना धक्काबुक्की करीत मंदिराबाहेर काढले होते. याबाबत अकोले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे़ किसन कारभारी वैद्य (वय ८०) यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या घटनेनंतर गावात तातडीची ग्रामसभा बोलावली होती. ग्रामसभेत गावकऱ्यांनी ९ ग्रामस्थांची समिती नेमली आहे. त्यात भाऊसाहेब वैद्य, अमोल वैद्य, लक्ष्मण वैद्य, सुभाष वैद्य, रोहिदास वैद्य, माधव वैद्य, सखाराम वैद्य, पुंजा वैद्य, विष्णूपंत वैद्य यांचा समावेश आहे.

Web Title: Saracanch wife refused to enter the temple after remarriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.