जिल्हाध्यक्षपदी संतोष कुटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:46+5:302020-12-31T04:20:46+5:30

कोपरगाव : मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संपर्कप्रमुख राजेंद्र औताडे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील ...

Santosh Kute as District President | जिल्हाध्यक्षपदी संतोष कुटे

जिल्हाध्यक्षपदी संतोष कुटे

कोपरगाव : मराठा उद्योजक लॉबीचे संस्थापक अध्यक्ष विनोद बडे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा संपर्कप्रमुख राजेंद्र औताडे यांच्या उपस्थितीत शिर्डी येथील कार्यक्रमात मराठा उद्योजक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारिणीत कोपरगाव येथील संतोष कुटे यांची अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

तसेच राहुल आढाव यांची जिल्हा संपर्कप्रमुखपदी, डॉ. आदित्य पाटील यांची जिल्हा आरोग्य सचिव रावीज पिंगळे यांची अहमदनगर महिला जिल्हा सह संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली.

दरम्यान, कोपरगाव येथे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष संतोष कुटे व जिल्हा संपर्कप्रमुख राहुल आढाव यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी संदीप आहेर उपस्थित होते.

...................

फोटो३०- पदाधिकारी सत्कार, कोपरगाव

301220\img-20201225-wa0001.jpg

??????? ???? ???? ?????????? ????? ????? ????? ??????????? ??????????????? ?????? ????.

Web Title: Santosh Kute as District President