जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी संजयकुमार निक्रड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:45+5:302021-09-19T04:22:45+5:30
वाळकी : जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी संजयकुमार निक्रड यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील गणित अध्यापकांची ऑनलाईन व ऑफलाईन ...

जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी संजयकुमार निक्रड
वाळकी : जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी संजयकुमार निक्रड यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील गणित अध्यापकांची ऑनलाईन व ऑफलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा माध्यमिक भवनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ही निवड करण्यात आली.
यावेळी एकमताने नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. याप्रसंगी मंडळाचे माजी पदाधिकारी दत्तात्रय सस्ते, सुधीर काळे, कल्याण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी संजयकुमार निक्रड, कार्याध्यक्ष भागवत गायकवाड, सचिव राजेंद्र खेडकर, उपाध्यक्ष बाळासाहेब निवडुंगे, सुहास महाजन, नवनाथ घुले, सहसचिव शहाजी मुन्तोडे, सुधीर आपटे, राजेंद्र बारगुजे, खजिनदार भरत वारुळे, विद्या समिती- शिवप्रसाद मेहेत्रे, अतुल पटवा, जिल्हा परीक्षा प्रमुख- विष्णू मगर, प्रसिद्धिप्रमुख- सुरेश वाबळे यांची निवड करण्यात आली.