जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संजय कोठारी यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:06+5:302021-08-14T04:26:06+5:30

जामखेड : स्थानकवासी श्वेतांबर जैन कॉन्फरन्स दिल्ली या स्थानकवासी जैन समाजाच्या मातृ संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र राज्याची निवडणूक बिनविरोध ...

Sanjay Kothari elected to the National Executive of the Jain Conference | जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संजय कोठारी यांची निवड

जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत संजय कोठारी यांची निवड

जामखेड : स्थानकवासी श्वेतांबर जैन कॉन्फरन्स दिल्ली या स्थानकवासी जैन समाजाच्या मातृ संस्थेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्र राज्याची निवडणूक बिनविरोध झाली. जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची या कार्यकारिणीत वर्णी लागली. त्यांना तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांची २००५ साली महाराष्ट्र प्रांतीय युवा शाखापदी निवड झाली होती. नंतर २०१६ ते २०१८ भरघोस मताने निवडून आले. तसेच २०१८ ते २०२१ आणि २०२१ ते २०२३ अशी पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणी पदावर बिनविरोध निवड झाली आहे. संजय कोठारी हे त्यांच्या स्व. सुवालाल कोठारी प्रतिष्ठानमार्फत विविध सामाजिक कार्यक्रम राबवितात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची कार्यकारिणीवर तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली. त्यांच्या निवडीचे राहुल शिंगवी, प्रफुल्ल सोळंकी, सतीश बोरा, अरून लटके, राजकुमार अचलिया, अमोल तातेड, आदित्य मंडलेचा, प्रशांत बोरा, प्रवीण बोरा, आनंद नहार, संजय बोरा, संजय नहार, संजय कटारिया, हितेश बलदोटा, डॉ. राहुल लद्धड, महावीर सुराणा, आकाश बाफना, अशोक पितळे, महेश भंडारी, नितीन बोथरा, कैलाश शर्मा, मनोज भंडारे, आदींनी स्वागत केले.

----

१३ संजय कोठारी

Web Title: Sanjay Kothari elected to the National Executive of the Jain Conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.