जामखेडच्या मॅरेथॉन स्पर्धेत संजय झाकणे प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST2021-09-19T04:22:05+5:302021-09-19T04:22:05+5:30
जामखेड : भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित आठ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत तालुक्यातील राजुरी येथील संजय झाकणे याने १८ मिनिटांत ...

जामखेडच्या मॅरेथॉन स्पर्धेत संजय झाकणे प्रथम
जामखेड : भाजप युवा मोर्चाच्या वतीने आयोजित आठ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत तालुक्यातील राजुरी येथील संजय झाकणे याने १८ मिनिटांत अंतर पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला. रामेश्वर मुंजाळ द्वितीय, तर विक्रम बोरुडे याने तिसरा क्रमांक पटकाविला. २३० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
जामखेड येथील खर्डा-करमाळा रस्त्यावरील चौफुला येथे भाजप युवा मोर्चाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. यावेळी माजी मंत्री प्रा. राम शिंदे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष अभयसिंह राळेभात, वैभव कार्ले आदी प्रमुख उपस्थित होते.
चौथा क्रमांक महेश वाकुडे, पाचवा क्रमांक दीपक गाढवे यांनी पटकाविला. यावेळी विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अमोल राळेभात, पंचायत समितीचे माजी सभापती डाॅ. भगवान मुरुमकर, उद्योजक राजेंद्र देशपांडे, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, ज्योती क्रांती मल्टिस्टेट संस्थेचे अध्यक्ष आजिनाथ हजारे, जिल्हा उपाध्यक्ष संजय कार्ले, प्रवीण सानप, काशिनाथ ओमासे, उपाध्यक्ष मोहन गडदे, प्रवीण चोरडीया, नगरसेवक अमित चिंतामणी, गणेश आजबे, बिभीषण धनवडे, पांडुरंग उबाळे, सचिन सदाफुले, पिंटू वस्ताद माने, कैलास नेटके, वैभव कार्ले, योगिराज राऊत, प्रवीण कार्ले, मोहन देवकाते, चंद्रकांत कार्ले, नितीन धनवटे, आशिष कार्ले, बंडू कार्ले, अंगद कार्ले, राहुल पवार, विनोद गंभीरे, मंगेश कार्ले आदी उपस्थित होते.
180921\img-20210917-wa0029.jpg
(फोटो - आठ कि. मी. मॅरेथॉन स्पर्धेत संजय झाकणे यास ट्रॉफी व बक्षिस प्रदान करताना माजी मंत्री राम शिंदे व शरद कार्ले)