जामखेडमध्ये ‘पोलीस रेझिंग डे’ निमित्त स्वच्छता सायकल रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:54+5:302021-01-03T04:21:54+5:30
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले, माझे शहर, स्वच्छता अभियान, सायकल रॅली, कॉलेज -शाळामधील विद्यार्थ्यांना शस्त्राची व पोलीस स्टेशनच्या कामकाजाची ...

जामखेडमध्ये ‘पोलीस रेझिंग डे’ निमित्त स्वच्छता सायकल रॅली
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड म्हणाले, माझे शहर, स्वच्छता अभियान, सायकल रॅली, कॉलेज -शाळामधील विद्यार्थ्यांना शस्त्राची व पोलीस स्टेशनच्या कामकाजाची माहिती देणे, एका विद्यार्थ्याला पोलीस ठाणे अंमलदारचा चार्ज देणे, जेष्ठ नागरिकांचे तक्रारीचे निरसन करणे, विद्यालय व महाविद्यालय येथे जाऊन महिला व मुलींच्या सुरक्षा विषयी मार्गदर्शन करणे, वाहतुकीचे नियम सांगणे, जनसामान्यात पोलीस हा जनतेचा मित्र आहे. यासाठी विविध खेळाचे आयोजन करणे, सामाजिक सलोखा राखणे असे विविध उपक्रम सप्ताहात आयोजित केले आहेत.
‘रेझिंग डे’ कार्यक्रमाची सुरूवात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी करण्यात आली. स्वच्छता सायकल रॅलीचे उद्घाटन जामखेडचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केले. पालिकेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, नागेश विद्यालयाचे प्राचार्य प्रा. हरिभाऊ ढवळे, एनसीसी विभाग प्रमुख गौतम केळकर, अविनाश ढेरे, अनिल देडे, मयुर भोसले, जामखेड महाविद्यालय, नागेश विद्यालय, ल.ना.होशिंग विद्यालय येथील एन.सी.सी.विभागामधील १०० विद्यार्थी सहभागी झाले. सायकल रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी जनजागृती केली.
..
०२ जामखेड पोलीस सायकल रॅली
...
ओळी- जामखेड येथे ‘पोलीस रेझिंग डे’ निमित्ताने सायकल रॅली व स्वच्छता जनजागरण अभियान राबविण्यात आले.