संगमनेरमध्ये चोरट्यांनी एटीएम लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 11:35 IST2019-06-22T11:35:27+5:302019-06-22T11:35:42+5:30

नाशिक-पुणे महामार्गावरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या गुंजाळवाडी शाखेबाहेर याच बँकेचे एटीएम मशीन असलेल्या खोलीचा काचेचा दरवाजा फोडून चोरट्यांनी एटीएम मशीन उचलून नेले.

 In Sangamner, thieves stopped ATMs | संगमनेरमध्ये चोरट्यांनी एटीएम लांबविले

संगमनेरमध्ये चोरट्यांनी एटीएम लांबविले

संगमनेर : नाशिक-पुणे महामार्गावरील बँक आॅफ महाराष्ट्रच्या गुंजाळवाडी शाखेबाहेर याच बँकेचे एटीएम मशीन असलेल्या खोलीचा काचेचा दरवाजा फोडून चोरट्यांनी एटीएम मशीन उचलून नेले. ही घटना शनिवारी (२२ जून) पहाटे झाली.
एटीएम मशीनमधे किती रक्कम होती याबाबत निश्चित माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशीन तोडून उचलून नेले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title:  In Sangamner, thieves stopped ATMs