संगमनेर नगरपालिकेच्या सभेत तब्बल २५३ विषय एकमताने मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2017 13:53 IST2017-05-20T13:53:56+5:302017-05-20T13:53:56+5:30
नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विकासकांच्या संदर्भातील तब्बल २५३ विषय एकमताने मंजूर करण्यात आले आहेत़

संगमनेर नगरपालिकेच्या सभेत तब्बल २५३ विषय एकमताने मंजूर
आॅनलाईन लोकमत
संगमनेर, दि़ २० - नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विकासकांच्या संदर्भातील तब्बल २५३ विषय एकमताने मंजूर करण्यात आले आहेत़
नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली़ सभेत शास्त्रशुद्ध पद्धतीने शहरातील कचरा निर्मुल करणे, बायोगॅस प्रकल्पातून वीज निर्मिती करणे, भूमीगत गटार योजना, नेहरु उद्यानात माहिती केंद्र उभारणे, नदीकाठावरील जमिनींचा गाळपेरसाठीचा प्रस्ताव करणे, अशोक चौकातील शाळा नंबर एक येथे अभ्यासिका, पथदिवे, रस्ते काँक्रिटीकरण-डांबरीकरण, प्रवरा-म्हाळुंगी नदीकाठ व नाला परिसर सुशोभिकरण आदी विषयांना मंजूरी देण्यात आली आहे. सदस्यांनी प्रभागातील समस्या मांडल्या़ त्याचे प्रशासनाने निरसन केले. यावेळी उपनगराध्यक्ष नितिन अभंग, नगरसेवक दिलिप पुंड, सुनंदा दिघे, डॉ. दानिश शेख, विश्वास मुर्तडक, गजानन अभंग, हिरालाल पगडाल, शैलेश कलंत्री, कुंदन लहामगे, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर उपस्थित होते.