संगमनेर शहर हॉटस्पॉट जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 05:21 IST2020-05-10T05:21:22+5:302020-05-10T05:21:51+5:30

संगमनेर शहरातील कुरण रस्ता परिसरातील महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे.

 Sangamner city hotspot announced | संगमनेर शहर हॉटस्पॉट जाहीर

संगमनेर शहर हॉटस्पॉट जाहीर

संगमनेर (जि़ अहमदनगर) : तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक येथील ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू कोरोनाची लागण होऊन झाला होता. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी दुपारी स्पष्ट झाले़ त्यानंतर रात्री उशिरा आलेल्या अहवालात इतर दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले़ त्यामुळे धांदरफळ गावातील कोरोना रुग्णांची संख्या ६ तर संगमनेर तालुक्यातील रुग्ण संख्या ७ झाली आहे़
संगमनेर शहरातील कुरण रस्ता परिसरातील महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील इस्लामपुरा, कुरण रोड, बिलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर आणि कुरण व मौजे धांदरफळ बुद्रूक (संगमनेर तालुका) हा परिसर हॉटस्पॉट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घोषित केला. या क्षेत्रातील सर्व अस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री इत्यादी ९ ते २२ मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title:  Sangamner city hotspot announced