ग्रामस्थांच्या विरोधापुढे वाळूतस्कर नमले

By Admin | Updated: August 12, 2014 23:17 IST2014-08-12T23:06:02+5:302014-08-12T23:17:35+5:30

राहुरी : केंदळ बुद्रुक ग्रामस्थांंनी घेतलेल्या खमक्या भूमिकेपुढे वाळूतस्करांनी वाळूउपसा न करण्याची तोंडी हमी दिल्याने वादावर पडदा पडला.

The sandwiches were against the opposition of the villagers | ग्रामस्थांच्या विरोधापुढे वाळूतस्कर नमले

ग्रामस्थांच्या विरोधापुढे वाळूतस्कर नमले

राहुरी : तालुक्यातील केंदळ बुद्रुक ग्रामस्थांंनी घेतलेल्या खमक्या भूमिकेपुढे नमते घेत वाळूतस्करांनी गावच्या हद्दीतून वाळूउपसा न करण्याची तोंडी हमी दिल्याने या वादावर पडदा पडला.
आरडगाव व शिलेगाव परिसरात असलेल्या मुळा नदीच्या पात्रातील वाळू उपसा केल्याने विहीरींच्या पाण्याची पातळीने तळ गाठला आहे़ पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी पूर्वीपासून वाळू सुरक्षित ठेवण्यात यश मिळविले़ मात्र काल वाळू तस्करांनी केंदळच्या वाळूकडे लक्ष वेधले़ वाळू उचलण्यास सुरूवात केल्यानंतर ग्रामस्थांनी त्यास मज्जाव केला़ कोणत्याही परिस्थितीत आमच्या परिसरातील वाळू उचलू देणार नाही, असा इशारा देण्यात आला़ अखेर ग्रामस्थांचा रोष लक्षात घेता वाळू उचलणार नसल्याची हमी देत वाळूतस्करांनी नमते घेतले. त्यामुळे या वादावर पडदा पडला.
बारागाव नांदूरपासून आरडगाव-शिलेगावपर्यंत मोठ्य प्रमाणावर वाळूउपसा झाल्याने विहिरंींनी तळ गाठला आहे़ मात्र केंदळ बुद्रुक परिसरात वाळूची थाप टिकून ठेवण्यात ग्रामस्थांच्या एकीमुळे यश आले आहे़ यासंदर्भात सरपंच गोरक्षनाथ तोरडे, प्रदीप हरिश्चंद्रे, भिमराज चव्हाण, मधुकर तारडे, नरहरी तारडे, विठ्ठल तारडे, अण्णासाहेब तारडे, श्रीकृष्ण भोसले, प्रवीण तारडे, वैभव तारडे आदींनी विरोध केला आहे़
(तालुका प्रतिनिधी)
मुळा नदीतून रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे़ केंदळ ग्रामस्थांनी वाळू उपशाला सुरूवातीपासून विरोध केल्याने वाळू सुरक्षित राहिली. वाळू उपसा होऊ नये म्हणून जेसीबीने सीमारेषा आखून देण्यात आली आहे़ तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदनाद्वारे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही.
- गोरक्षनाथ तारडे, सरपंच केंदळ बुद्रुक

Web Title: The sandwiches were against the opposition of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.