नेवाशात एसटीवर लावले संभाजीनगर नावाचे स्टिकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:21 IST2021-01-25T04:21:38+5:302021-01-25T04:21:38+5:30
नेवासा : औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करावे, या मागणीसाठी नेवासा बसस्थानक व नेवासा फाटा येथे मनसेच्यावतीने रविवारी सकाळी ...

नेवाशात एसटीवर लावले संभाजीनगर नावाचे स्टिकर
नेवासा : औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर असे करावे, या मागणीसाठी नेवासा बसस्थानक व नेवासा फाटा येथे मनसेच्यावतीने रविवारी सकाळी आंदोलन करण्यात आले. यावेळी एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगर असे स्टिकर लावण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव औरंगाबाद शहराला येत्या २६ जानेवारीपर्यंत देण्यात यावे, यासाठी नेवासा येथील एसटी बसस्थानकातील औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसेसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक लावण्यात आले. यावेळी तरुणांनी घोषणाबाजी केली.
यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संभाजीनगर नावाला विरोध दर्शविल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दिगंबर पवार, तालुका उपाध्यक्ष योगेश काळे, नेवासा विधानसभा विभाग अध्यक्ष रवींद्र पिंपळे, तालुका सचिव अविनाश गाढवे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष ऋषिकेश जंगम, तुषार शेळके, मयूर नरोडे, कमलेश नवले, अक्षय आरगडे सदस्य शुभम कुसळकर आदी उपस्थित होते.
फोटो : २४ नेवासा आंदोलन
नेवासा येथील बसस्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाणाऱ्या बसेसवर संभाजीनगर नावाचे स्टिकर लावले.