तुषार ठुबे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:36+5:302020-12-05T04:38:36+5:30
टाकळी ढोकेश्वर : रागयड येथील भजनसम्राट तथा समाजभूषण स्व. विठोबा अ. मरवडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त स्व. विठोबा अ. ...

तुषार ठुबे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर
टाकळी ढोकेश्वर : रागयड येथील भजनसम्राट तथा समाजभूषण स्व. विठोबा अ. मरवडे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त स्व. विठोबा अ. मरवडे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री सायन्स कॉलेजचे प्रा. तुषार ठुबे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार मरवडे यांनी दिली. प्रा. ठुबे यांनी कोविडच्या काळात रस्त्यावर उतरून केलेल्या कामाची व ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या पथनाट्याची निर्मिती केली होती. त्यांना ‘आडवाटेच्या पारनेर’च्या पथकानेही त्यांना मदत केली. त्याचे प्रयोग राज्यभर करीत समाजप्रबोधन केले होते.
फोटो ०४ तुषार ठुबे