बेलापुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:02+5:302021-03-15T04:19:02+5:30

बेलापूर : येथील नाभिक समाजातील तरूण कार्यकर्ते व सलून कारागीर चंद्रप्रसाद सूर्यकांत हुडे (वय २०) या तरूणाने सलून दुकानातच ...

Salon trader commits suicide in Belapur | बेलापुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या

बेलापुरात सलून व्यावसायिकाची आत्महत्या

बेलापूर : येथील नाभिक समाजातील तरूण कार्यकर्ते व सलून कारागीर चंद्रप्रसाद सूर्यकांत हुडे (वय २०) या तरूणाने सलून दुकानातच शनिवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली.

चंद्रप्रसाद याने नुकतेच दुकानाचे नुतनीकरण करून नव्याने उभारणी केली होती. त्याचा व्यवसाय उत्तम सुरू होता. प्रतिकूल परिस्थितीतही चंद्रप्रसाद याने प्रगती केली होती. आपल्या तीन बहिणींचे विवाह त्याने केले होते.

चंद्रप्रसाद याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, तीन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.

दरम्यान, गळफास घेण्याच्या काही तासांपूर्वी चंद्रप्रसाद याने मोबाईलवर अमरधामचा ‘स्टेटस’ ठेवला होता. मोबाईल पोलिसांनी जप्त केला असून, याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Salon trader commits suicide in Belapur