हातभट्टीसह विदेशी दारूची विक्री; कोपरगावात चौघांवर गुन्हा
By रोहित टेके | Updated: April 17, 2023 18:43 IST2023-04-17T18:43:01+5:302023-04-17T18:43:08+5:30
कोपरगाव : तालुक्यातील चासनळी व धारणगाव शिवारात हातभट्टीची तसेच विदेशी दारू विकणाऱ्यांवर पोलिसांनी सोमवारी (दि. १७) दिवसभरात वेगवेगळ्या कारवाई ...

हातभट्टीसह विदेशी दारूची विक्री; कोपरगावात चौघांवर गुन्हा
कोपरगाव : तालुक्यातील चासनळी व धारणगाव शिवारात हातभट्टीची तसेच विदेशी दारू विकणाऱ्यांवर पोलिसांनी सोमवारी (दि. १७) दिवसभरात वेगवेगळ्या कारवाई करून चौघांवर गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून ५५ हजार ५२० रुपये किंमतीची ९६५ लिटर हातभट्टीची तसेच विदेशी दारूच्या १२ बाटल्या जप्त केल्या आहेत.
यामध्ये तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदीच्या काठी काटवनात हातभट्टीची दारू तयार करून विक्री करणाऱ्या मिथुन छगन माळी (वय ३६ ), कृष्णा सूर्यभान दळे व शिवाजी उर्फ पिंटू संपत माळी ( तिघे रा. चासनळी ता. कोपरगाव ) या तिघांवर वेगवेगळ्या कारवाईतून गुन्हे दाखल केले आहेत. तसेच धारणगाव शिवारात स्वप्नपूर्ती किराणा दुकानाच्या आडोशाला देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या राकेश साहेबराव रणशूर ( वय ३२ रा. धारणगाव ता. कोपरगाव ) याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.