शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

साकळाई पाणी योजना मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत उपोषण सुरूच : दीपाली सय्यद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 11:35 IST

नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे

ठळक मुद्देनगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई योजनाकालपासून अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरूखासदार डॉ.सुजय विखे यांनीही योजना मंजूर करणारच, असे आश्वासन दिले होतेमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी योजना मंजूर करण्याचे आश्वासन दिले होतेजोपर्यंत मंजुरीचे पत्र हाती पडणार नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारआंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विजय पाटकर, मानसी नाईक, स्मिता परदेशी यांच्यासह कलाकार येणार

अहमदनगर : नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ३५ गावांना वरदान ठरणारी साकळाई योजना जोपर्यंत मंजूर होत नाही व मंजुरीचे पत्र हातात पडत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी केला.नगर व श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामस्थांना सोबत घेत सय्यद यांनी कालपासून (शुक्रवार) साकळाई उपसा सिंचन पाणी योजनेसाठी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून श्रीगोंदा, नगर तालुक्यातील ३५ गावांना लाभदायक ठरणारी साकळाई उपसा सिंचन योजना फक्त निवडणुकीच्या प्रचारापुरती चर्चेत येते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी योजनेबाबत आश्वासन दिले होते. परंतु अद्याप हा प्रश्न असाच असल्याने शुक्रवारपासून दीपाली सय्यद यांनी उपोषण सुरू केले आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेला जोपर्यंत मंजुरीचे पत्र हाती पडणार नाही, तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार सय्यद यांनी केला आहे.सय्यद यांच्या आंदोलनाला ग्रामस्थांसह जिल्हा परिषदेच्या सभापती अनुराधा नागवडे, ज्येष्ठ नेते दादापाटील शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष उध्दव दुसुंगे, शिवप्रहार संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी सायंकाळनंतरही आंदोलन सुरूच होते. साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी अभिनेत्री सय्यद यांनी आंदोलन सुरू केले असून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी अभिनेता विजय पाटकर, मानसी नाईक, स्मिता परदेशी यांच्यासह अन्य मराठी सिनेकलाकार येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषदSujay Vikheसुजय विखेRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलShalini Vikhe Patilशालिनी विखे पाटील