लोकमत सखी मंच व वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे महिलांसाठी ‘सखी महोत्सव’
By Admin | Updated: May 14, 2014 00:19 IST2014-05-13T23:46:26+5:302014-05-14T00:19:05+5:30
महिलांच्या प्रतिभेला एक सशक्त मंच देत त्यांच्यातील कलागुणांची उधळण करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या लोकमत सखी मंचतर्फे महिलांसाठी एक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
लोकमत सखी मंच व वामन हरी पेठे ज्वेलर्स तर्फे महिलांसाठी ‘सखी महोत्सव’
अहमदनगर : महिलांच्या प्रतिभेला एक सशक्त मंच देत त्यांच्यातील कलागुणांची उधळण करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या लोकमत सखी मंचतर्फे महिलांसाठी एक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याअंतर्गत विविध कार्यक्रम होणार असून, महिलांना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे. दि. १८ मे २०१४ रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत सहकार सभागृह, स्टेशन रोड, अहमदनगर येथे होणार्या या स्पर्धेमध्ये समूह रांगोळी स्पर्धा, ब्रायडल मेकअप स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, समूहगीत गायन स्पर्धा, सोलो नृत्य स्पर्धा, मेहंदी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धा सखी मंच सभासदांना नि:शुल्क असून इतर महिलांना रु. २०० प्रवेश शुल्क असणार आहे. तसेच अहमदनगर सखी सम्राज्ञी २०१४ अंतिम फेरीही सायं. ४ ते ७ या वेळेत होणार आहे. सखींनी जास्तीत जास्त संख्येने या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा. या स्पर्धांचे नियम : समूह रांगोळी स्पर्धा साईज ४ बाय ४ स्क्वे. फूट ग्रुपमध्ये कमीत कमी दोन व जास्तीत जास्त ४ असावे. सर्व साहित्य स्वत: आणावे. चाळणी व गाळणीचा वापर करता येणार नाही. वेळ १ तास. ब्रायडल मेकअप- वेळ एक तास, मेकअपसाठी मॉडेल स्वत: आणावी. फॅन्सी ड्रेस- वेळ ३० सेकंद सोलो डान्स- वेळ २ मिनिटे समूहगीत गायन- ४ ते ८ कलावंत, वेळ ५ मिनिटे कुठल्याही प्रकारचे समूहगीत. मेहंदी स्पर्धा- मॉडेल स्वत: आणावी. वेळ ४५ मिनिटे परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. या कार्यक्रमासाठी वामन हरी पेठे ज्वेलर्स, अहमदनगर हे प्रायोजक आहेत. सोनेरी क्षणांचे सोबती असलेल्या या दालनात कलर्स कलेक्शन, अॅन्टीक नेकलेस, कलकत्ता पॅटर्न असे नाविन्यपूर्ण दागिने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच येथे रियल डायमंडस्चेही आकर्षक कलेक्शन उपलब्ध आहे. स्पर्धांच्या अधिक माहिती व नाव नोंदणीकरिता लोकमत सखी मंच, लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी रोड येथे फोन नं. २४२९९०२, २४२९७११, ९८५००७२७६३, ९८५०२६४२०० या मो. क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व स्पर्धांना प्रवेश मर्यादित असल्याने लवकरात लवकर नाव नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) ‘सखी सम्राज्ञी २०१४’ ची अंतिमफेरी या दरम्यान सखी सम्राज्ञी २०१४ ची अंतिम फेरीही रंगणार आहे. दु. ४ वाजता सहकार सभागृह, स्टेशन रोड, अहमदनगर येथे होणार्या सखी महोत्सवात समूह रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, समूहगीत गायन, फॅन्सी ड्रेस, ब्रायडल मेकअप, सोलो डान्स व रेसीपी स्पर्धा (तिखट व्हेज स्नॅक) आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. स्पर्धांच्या नाव नोंदणीकरिता ९८५०२६४२०० या क्रमांकावर संपर्क करावा. ‘‘सखी सम्राज्ञी’’ या अंतिम फेरीत प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता शेवाळे या उपस्थित राहणार आहेत. तसेच नावीन्यपूर्ण कलाविष्कार, अॅडमॅडशोचे विनोदी नाटकी पद्धतीने सादरीकरण होणार असून, ते कार्यक्रमाची रंगत ठरणार आहे.