साईसंस्थानच्या ६३५ कंत्राटी कामगारांना कायम करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 13:58 IST2019-09-18T13:57:33+5:302019-09-18T13:58:09+5:30
वर्षानुवर्षे संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या ६३५ कर्मचाºयांच्या जीवनात मंगळवारी सुखाचा दिवस उजाडला. या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यास राज्य शासनाने अनुमती दिली़ यामुळे सव्वा महिना आधीच संस्थानमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे.

साईसंस्थानच्या ६३५ कंत्राटी कामगारांना कायम करणार
शिर्डी : वर्षानुवर्षे संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करणा-या ६३५ कर्मचा-यांच्या जीवनात मंगळवारी सुखाचा दिवस उजाडला. या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यास राज्य शासनाने अनुमती दिली़ यामुळे सव्वा महिना आधीच संस्थानमध्ये दिवाळी साजरी केली जात आहे.
साईसंस्थानात सन २००० ते २००४ पर्यंतच्या ६३५ कर्मचा-यांना याचा लाभ मिळणार आहे़ या कर्मचा-यांना एकत्रित मासिक वेतनावर घेण्यात येणार आहे़ साईसंस्थानात १९९१ ते २००० या दरम्यान काम करणाºया १०५२ कंत्राटी कर्मचा-यांना २१ आॅगस्ट २००८ रोजी राज्य शासनाने संस्थान सेवेत सामावून घेण्यास अनुमती दिली होती़ २००० नंतरचे कामगार संस्थान सेवेत येण्याच्या प्रतीक्षेत आजवर संस्थानात कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत़ २००४ साली राज्य शासनाने संस्थान कायदा करून आपल्या अधिपत्याखाली घेतले़ त्यामुळे २००४ साली नवीन अधिनियम लागू होण्याच्या पूर्वीच्या कामगारांना संस्थान सेवेत घेण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव होता़ मंगळवारी या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला़ या निर्णयाप्रमाणेच उर्वरित २०१८ पर्यंतच्या कामगारांनाही संस्थान सेवेत घेण्यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, डॉ़ सुरेश हावरे, संस्थानचे विद्यमान अध्यक्ष व्यवस्थापन व मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांचे प्रयत्न सुरू आहेत़
या अध्यादेशानुसार कुशल कामगारांना ५ हजार ९१३ व अकुशल कामगारांना ५ हजार ११३ इतक्या एकत्रित मासिक वेतनावर किंवा किमान वेतन कायद्यानुसार जे अधिक असेल त्यानुसार घेण्याचा वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यापूर्वी २००८ मध्येही कामगारांना अशाच प्रकारे संस्थान सेवेत सामावून घेण्यात आले होते़