शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

साईनगरीत सोशल डिस्टन्सींग सक्तीचे; रोज भरणारी मंडई बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 17:45 IST

 साईनगरीत भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी कमी  करण्यासाठी नगरपंचायत व महसूल विभागाने विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सींग सक्तीचे केले आहे.

शिर्डी :  साईनगरीत भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी कमी  करण्यासाठी नगरपंचायत व महसूल विभागाने विक्रेत्यांचे विकेंद्रीकरण करण्याबरोबरच सोशल डिस्टन्सींग सक्तीचे केले आहे. प्रांताधिकारी गोंविंद शिंदे व मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी या संदर्भात एक पत्रक काढले आहे.          आठवडा बाजाराबरोबरच रोज भरणारी मंडई बंद करण्यात आली आहे. त्याऐवजी प्रत्येक उपनगरात भाजीपाला विक्रीच्या चौदा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यात लक्ष्मीनगर, दत्तनगर, कालिकानगर, बनरोड, बिरेगाव बन, पाचशे रूम, साकुरी शिव, पानमळा चौक, गणेशवाडी, श्रीकृष्णनगर, विश्वकर्मा मंदिर, कनकुरी रोड, खंडोबा मंदिर आदी ठिकाणांचा समावेश आहे.    प्रत्येक ठिकाणी दोन भाजीपाला विक्रेते पंधरा-वीस फूट अंतर ठेवून बसणार आहेत. त्यांना आपल्या दुकानासमोर चुन्याने सहा ते आठ फूट अंतराने चार फूट बाय चार फुटाचे चौकोन आखावे लागणार आहेत. एका चौकोनात एका ग्राहकाला उभे करूनच ग्राहकांची रांग लावून भाजीपाला विकावा लागणार आहे. एका दुकानात एकच विक्रेता असणे बंधनकारक असणार आहे. परिसरात स्वच्छता ठेवणे, दुकान लावून भाजीपाला विकणारे किंवा फिरून भाजीपाला विकणारांना ओळखपत्र बरोबर ठेवावे लागणार आहे. योग्य दराने भाजीपाला विक्री करणे बंधनकारक असणार आहे. याशिवाय दुकानांच्या व्यतिरिक्त हातगाडी किंवा अ‍ॅपे रिक्षाद्वारे नागरिकांच्या वसाहतीपर्यंत किंवा घरापर्यंत भाजीपाला विक्रीसही अनुमती देण्यात आली आहे.भोंगा लावून सूचनासाईनगरीत गाडीला भोंगा लावून शहरातील नागरिकांना घरातच थांबण्याच्या सूचना लाऊड स्पीकरवरून करण्यात येत आहेत. उपनगरातील प्रत्येक कॉलनीतही स्वच्छता व फवारणी सुरू करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी सतिष दिघे यांनी दिली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीsaibabaसाईबाबाcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य