शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

साईबाबा जन्मस्थळाचा वाद : शिर्डी आजपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 07:37 IST

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे.

शिर्डी : साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण केल्याच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी शहर बेमुदत काळासाठी बंद करण्यात आले आहे. शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला. बंद काळात साईबाबा मंदिर उघडे राहणार असून, दुकाने, बाजार मात्र बंद राहतील. या बंदमध्ये पंचक्रोशीतील गावे सहभागी होणार आहेत.साईबाबा जन्मस्थळाचे पाथरीसह आठही दावे तथ्यहीन व दिशाभूल करणारे आहेत़ पाथरीला निधी देण्यास विरोध नाही, मात्र जन्मस्थळाच्या उल्लेखाला तीव्र आक्षेप आहे़ मुख्यमंत्री आपले विधान मागे घेत नाहीत, तोपर्यंत शिर्डी बेमुदत बंद राहील, असा निर्णय ग्रामसभेत झाला़ या सभेला राधाकृष्ण विखे पाटील व शिर्डी तसेच पंचक्रोशीतील नागरिक व साईभक्त हजर होते.साईबाबांच्या जन्म, गाव, जात, धर्माबद्दल आमच्या पूर्वजांनाही माहिती नव्हती, असे त्यांच्या वंशजांनी सांगितले़ यात तात्या कोतेंचे नातू मुकुंदराव कोते, नंदलाल मारवाड्याचे वंशज दिलीप संकलेचा, म्हाळसापतीचे पणतू दीपक नागरे, अब्दुल बाबाचे पणतू गणीभाई पठाण, भागोजी शिंदेचे पणतू सचिन शिंदे आदींचा समावेश होता़. साईबाबांनी जात, धर्म सांगितला नाही़ साईसचरित्रातही त्याचा उल्लेख नाही. त्यामुळे पाथरीसह सर्वच जन्मस्थळाच्या दाव्याला आपला तीव्र विरोध असल्याचे वंशजांनी सांगितले. 

राष्ट्रपती व मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देऊन बाबांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप सभेत करण्यात आला़ पाथरीला निधी देण्यास आमचा आक्षेप नाही. मात्र त्याला जन्मस्थळाची ओळख नको. साईबाबांची समाधी होऊन १०१ वर्षे झाल्यानंतर वारंवार वाद उभे करण्यात येत आहेत. मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देण्यात आल्याने त्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख केला़ त्यांनी तात्काळ खुलासा करून, भाविकांचा संभ्रम व संताप दूर करावा अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. बंद काळात साईमंदिर, प्रसादालय, भक्तनिवास, रूग्णालये, मेडिकल या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. हार-फुलांची व अन्य दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र बंद असतील.मुख्यमंत्र्यांनी विधान मागे घ्यावे- विखेमुख्यमंत्र्यांनी साई जन्मस्थळाबाबतचे वक्तव्य मागे घेऊन स्पष्टीकरण द्यावे, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते व शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यांनी केले़ जन्मस्थळाबाबत जे दावे केले जातात. त्याला पाठबळ देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी करू नये. या संदर्भात शासन समिती नेमण्याच्या विचारात आहे. त्यास आपला विरोध आहे़, असे ते म्हणाले.सोमवारी दोन्ही ग्रामस्थांची मुख्यमंत्री घेणार बैठकपुणे : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री सोमवारी शिर्डी व पाथरी ग्रामस्थांची बैठक घेणार आहेत, असे त्या म्हणाल्या. त्यांच्या आश्वासनानंतर पाथरीवासीयांनी आपला बंद मागे घेतला. मात्र शिर्डी बंदचा निर्णय कायम आहे. माजी न्यायाधीश व पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी. जन्मस्थानाबाबतच्या निवाड्यासाठी समितीला तीन महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी मागणी डॉ. गोºहे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.मंगळवारी पाथरीत सर्वपक्षीय बैठक : पाथरीत शनिवारी सायंकाळी कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़२१ जानेवारी रोजी श्री साई जन्मभूमी येथे परभणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आणि महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

टॅग्स :saibabaसाईबाबाSaibaba Mandirसाईबाबा मंदिरshirdiशिर्डी