शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
Daily Top 2Weekly Top 5

साई संस्थानकडून मंदिरातील भोजनाबाबत मोठा निर्णय; सुजय विखेंच्या मागणीनंतर उचललं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 10:16 IST

मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसाद भोजनाचे तिकीट दिले जाईल, असे गाडीलकर यांनी सांगितले.

Shirdi Sai Baba Sansthan: साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देण्यात येणारी मोफत भोजन व्यवस्था यापुढे केवळ भाविक व संस्थान रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठीच असेल. अन्य नागरिकांना प्रसादालयात भोजन करण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आज गुरुवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. भाविकांना प्रसाद भोजन घेणे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे.

काही लोक भोजनालयात मद्यपान करून येत असल्याचं, तसंच भोजनानंतर परिसरातच धूम्रपान करत असल्यामुळे साईभक्तांना त्रास होतो. यासारख्या अनेक तक्रारींमुळे प्रशासनाने हा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसादालयात सध्या रोज ४० ते ४५ हजार भाविक मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिराच्या बाहेर उदी-प्रसाद वाटप काउंटरजवळ मोफत भोजनाचे कूपन दिले जाईल, ते दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रवेश मिळेल. मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी मुखदर्शन हॉलमध्ये ऐच्छिक मोफत प्रसाद भोजनाचे तिकीट दिले जाईल, असे गाडीलकर यांनी सांगितले.

कशी असेल व्यवस्था?

संस्थान भाविकांसाठी निवासस्थानातील निवासस्थानातील स्वयंसेवी भोजन कक्षामध्ये रूमची पावती, चावी दाखवून प्रवेश दिला जाईल. रुग्णालयातील नातेवाइकांसाठी केसपेपर, अॅडमिट कार्ड दाखवून द्वारावती भक्तनिवास येथील प्रसाद भोजन कक्ष, मुख्य प्रसादालयात प्रवेश दिला जाईल. शालेय सहली, पालखी पदयात्रींसाठी प्रसादालय अधीक्षक खातरजमा करून विद्यार्थ्यांना, पदयात्रींना लेखी पत्र घेऊन प्रवेश देतील. नाश्ता पाकिटाचे कुपनही सकाळी दर्शनरांगेत देण्यात येणार आहेत. ते कूपन संबंधित काउंटरवर दाखवून तेथे पैसे भरून नाश्ता पाकीट मिळेल.

सुजय विखे यांनी केली होती मागणी

मोफत भोजनामुळे भिक्षेकरी व गुन्हेगार वाढल्याने भाविकांशिवाय इतरांसाठी मोफत भोजन बंद करावे, अशी मागणी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली होती.

टॅग्स :shirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिरAhilyanagarअहिल्यानगरSujay Vikheसुजय विखे