सराफांचे खासदारांना साकडे
By Admin | Updated: March 27, 2016 23:39 IST2016-03-27T23:35:19+5:302016-03-27T23:39:59+5:30
अहमदनगर : सोन्यावरील अबकारी कर लागू करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी शहरातील सराफ-सुवर्णकार व्यापाऱ्यांनी रविवारी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेऊन साकडे घातले़

सराफांचे खासदारांना साकडे
अहमदनगर : सोन्यावरील अबकारी कर लागू करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय मागे घेण्यासाठी शहरातील सराफ-सुवर्णकार व्यापाऱ्यांनी रविवारी खासदार दिलीप गांधी यांची भेट घेऊन साकडे घातले़ यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे आश्वासन गांधी यांनी व्यापाऱ्यांना दिले़
राज्य सराफ -सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथ्था यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खा़ गांधी यांची भेट घेतली़ शिष्टमंडळात संघटनेचे अध्यक्ष प्रकाश लोळगे, उपाध्यक्ष राजेंद्र शहाणे, सल्लागार निळकंठ देशमुख, सुभाष कायगावकर, प्रमोद बुऱ्हाडे, अॅड़ विजय रायमोकर, शिवनारायण वर्मा आदींचा समावेश होता़ यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद आहे, केंद्रीय अर्थमंत्री जेटली यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सोन्यावर १ टक्का अबकारी कर लावला असून, हा व्यवसाय एक्साईज कायद्याच्या अधिपत्याखाली आणण्याचा घाट घातला आहे़ मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)