शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीतून घोड धरणात आवर्तन

By admin | Updated: January 15, 2016 23:29 IST

श्रीगोंदा : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून 'कुकडी' प्रकल्पातील वडज व डिंभे धरणातून घोड धरणात ८५० दशलक्ष घनफूट (0.८५ टीएमसी) पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे

श्रीगोंदा : महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या आदेशानुसार शुक्रवारपासून 'कुकडी' प्रकल्पातील वडज व डिंभे धरणातून घोड धरणात ८५० दशलक्ष घनफूट (0.८५ टीएमसी) पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. दोन टप्प्यात हे पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी पत्रकारांना दिली.ते म्हणाले, घोड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुळ प्रकल्प आराखड्यात समाविष्ट नसलेली धरणे व कोल्हापूर पध्दतीचे ७४ बंधारे बांधण्यात आले. त्यामुळे बारमाही सिंचन प्रकल्प असलेले घोड धरण पूर्ण क्षमतेने भरले जात नाही. घोड खालील शेतकरी व शेती पाण्याअभावी संकटात आली म्हणून समन्यायी धोरणानुसार 'कुकडी' प्रकल्पातून घोड धरणात दीड टीएमसी पाणी सोडण्याची मागणी आम्ही जलसंपत्ती प्राधिकरणाकडे याचिकेद्वारे केली होती. याचिकेवरील सुनावणीनंतर प्राधिकरणाने घोड धरणात १.६ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र सदर याचिकेवरील पुनर्विलोकन याचिका दाखल झाल्यामुळे प्राधिकरणाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नव्हती. पुनर्विलोकन याचिकेच्या सुनावणीनंतर प्राधिकरणाने ५ जानेवारी रोजी कुकडी प्रकल्पातून घोड धरणात ०.८५ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले होते.महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश दिल्यानंतरही जलसंपदा विभागाने पाणी सोडण्यास विलंब केला. ही बाब आपण पालकमंत्री राम शिंदे व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. अखेर मकरसंक्रांतीच्या दिवसापासून पहिल्या टप्प्यात कुकडी प्रकल्पातील वडज धरणातून मीना नदीद्वारे पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून पुढील दहा दिवसात ४९८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगून नागवडे म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात डिंभे धरणातून ३५३ दशलक्ष घनफूट पाणी घोड धरणात सोडण्यात येणार आहे. कुकडी प्रकल्प ते घोड धरण्याच्या दरम्यान असलेले मीना नदीवरील २१ व घोड नदीवरील २३ असे एकूण ४४ कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यात हे पाणी अडविले जावू नये यासाठी या बंधाऱ्यांच्या फळ्या (ढापे) काढण्यात येणार आहेत. याशिवाय नदीपात्रातील व बंधाऱ्यावरील कृषी उपसा जलसिंचन योजनांचा वीज पुरवठा घोड धरणात पाणी सोडण्याच्या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)