कांदा वधारला
By Admin | Updated: June 29, 2014 00:29 IST2014-06-28T23:48:16+5:302014-06-29T00:29:04+5:30
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव उपबाजार समिती आवारात शुक्रवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला दोन हजार आठशे रुपये भाव मिळाला,
कांदा वधारला
तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव उपबाजार समिती आवारात शुक्रवारी झालेल्या लिलावात उच्च प्रतीच्या कांद्याला दोन हजार आठशे रुपये भाव मिळाला, अशी माहिती समिती सचिव दिलीप काटे, कुशाभाऊ मोरे यांनी दिली.
समितीत सुमारे २ हजार ४०० गोणी कांदा आवक झाली होती. दुय्यम दर्जाच्या कांद्याचे भाव ही एक हजार ते बाराशे रुपये निघाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. लिलाव प्रक्रियेदरम्यानच समितीचे प्रशासक दिलीप तिजोरे यांनी भेट दिली. कांदा मालाची आवक व बाजार समिती आवाराबाबतच्या आवश्यक सुधारणाबाबतचे सर्वेक्षण करुन त्यांनी कांदा विक्रेते व व्यापाऱ्यांशी चर्चा केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांची बाजार समितीबाबतचे मते जाणून घेऊ असे प्रशासकांनी पत्रकारांना सांगितले. दोन हजार आठशे रुपये भाव मिळालेले प्रभाकर गरड या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
(वार्ताहर)