मुळा धरणात जोमाने आवक

By Admin | Updated: July 22, 2014 00:05 IST2014-07-21T23:10:01+5:302014-07-22T00:05:39+5:30

राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्र गड परिसरात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाणी वाढले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता धरणाकडे ९१५० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती.

Rooted arrivals in radha dam | मुळा धरणात जोमाने आवक

मुळा धरणात जोमाने आवक

राहुरी : मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्र गड परिसरात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाणी वाढले आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजता धरणाकडे ९१५० क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती. चालू पावसाळयात पहिल्यांदाच एवढ्या वेगाने आवक सुरू आहे.
सोमवारी दिवसभर पाणलोट क्षेत्रावर ढगाळ वातावरण होते़ हरिश्चंद्र गड परिसर, तसेच कोतूळ या मुळाच्या पाणलोटक्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली़ त्यामुळे २६००० दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या ६२५० दशलक्ष घनफूट पाणी आहे. येत्या काही दिवसांत मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे नजिकच्या काळात धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा जमा होण्याची अपेक्षा आहे़ (तालुका प्रतिनिधी)
चिरपुंजेही ओव्हरफ्लो
भंडारदरा परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने लहान-मोठे लघूपाटबंधारे तलाव भरत आहेत. सोमवारी १५५ दशलक्ष घनफूट क्षमतेचा चिरपुंजे तलाव ओव्हरफ्लो झाला. या हंगामात भरलेला हा चौथा तलाव आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यंत भंडारदरा धरणाचा एकूण साठा २ हजार ४८५ दशलक्ष घनफूट झाला होता.

Web Title: Rooted arrivals in radha dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.