आदर्श पिढी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:16 IST2021-06-01T04:16:03+5:302021-06-01T04:16:03+5:30
करंजी : समाजात चांगली पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षकांचे असते. विद्यालयातील शिक्षणातून विद्यार्थी शिस्त व चांगले विचार आत्मसात करीत ...

आदर्श पिढी घडविण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची
करंजी : समाजात चांगली पिढी घडविण्याचे पवित्र काम शिक्षकांचे असते. विद्यालयातील शिक्षणातून विद्यार्थी शिस्त व चांगले विचार आत्मसात करीत असतात. विद्यार्थ्यांच्या त्या काळातील शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते, असे मत करंजीचे सरपंच बाळासाहेब अकोलकर यांनी व्यक्त केले.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील नवनाथ विद्यालयाचे प्राचार्य विठ्ठल मरकड नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात अकोलकर बोलत होते.
विद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना शिस्तीचे, वेळेचे व व्यायामाचे खरे महत्त्व कळते. या काळात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. मरकड सरांनी आपल्या सेवेच्या काळात ही भूमिका अतिशय चोख व इमानदारीने पार पाडली. त्यामुळे आज नवनाथ विद्यालयात शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत काम करीत असल्याचे अकोलकर यांनी सांगितले.
सातवडचे सरपंच राजेंद्र पाठक प्रमुख पाहुणे होते. यावेळी भोसे गावचे सरपंच विलास टेमकर, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आरोळे, श्रीकांत अकोलकर आदी हजर होते. शिक्षक श्रीकांत अकोलकर यांनी आभार मानले.
---
३१ करंजी सेवापूर्ती