शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

शिर्डीबाबत राजकीय पक्षांची ‘सबुरी’, विखेंची भूमिका महत्त्वाची  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2019 06:20 IST

पूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ पुनर्रचनेत २००९मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित होऊन शिर्डी मतदारसंघ बनला. त्यानंतर इथे जातीय समीकरणे अधिक मजबूत होत गेली

- शिवाजी पवारपूर्वीचा कोपरगाव मतदारसंघ पुनर्रचनेत २००९मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित होऊन शिर्डी मतदारसंघ बनला. त्यानंतर इथे जातीय समीकरणे अधिक मजबूत होत गेली. सर्वच राजकीय पक्षांनी त्यास आपापल्यापरीने खतपाणी घातले. आरक्षित असल्याने राजकीय पक्षांचे या मतदारसंघाकडे पाहण्याचे धोरणही ‘सबुरीचे’ असल्याचे दिसून येते.१९६२ च्या लोकसभेपासून (१९९६ चा अपवाद वगळता) मतदारसंघावर कायमच काँग्रेसची पकड राहिली आहे. मात्र, आरक्षित झाल्यानंतर शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या हातून सुटला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अहमदनगरची जागा टॉप प्रॉयरिटीची असल्याचे सांगितले. मात्र ५० वर्षे काँग्रेसचा गड असलेल्या शिर्डीबाबत ‘सबुरी’ का बाळगली? यावरून शिर्डी काँग्रेसकडूनही बेदखल झाल्याचे दिसते.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, शंकरराव कोल्हे, मधुकर पिचड, यशवंतराव गडाख यांच्यापासूनच सर्वच प्रस्थापित नेते या मतदारसंघात फारसा रस दाखवत नाहीत. त्याचा फायदा सेनेला होतो. याहीवेळी काँग्रेस-राष्टÑवादीचे सगळे लक्ष अहमदनगरच्या जागेवर आहे. शिर्डीबाबत कुणीच बोलत नाही.काँग्रेसकडून श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे, उत्कर्षा रुपवते, युवक काँग्रेसचे नेते हेमंत ओगले, प्रवक्ते राजू वाघमारे यांच्या नावांची सध्या चर्चा आहे.दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे व सदाशिव लोखंडे यांच्या रुपाने सलग दोन वेळा (अर्थात मोदी लाटेमुळे) वर्चस्व गाजविलेल्या शिवसेनेची स्थितीही फार चांगली नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फार पूर्वीच विद्यमान खासदार या नात्याने लोखंडे यांची उमेदवारी घोषित केली. मात्र, त्यानंतर निरीक्षक आणि संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या पक्षाच्या तालुकावार बैैठकांमध्ये शिवसैैनिकांनी लोखंडे यांच्याविरोधात रोष व्यक्त केला आहे. उमेदवार बदलासाठी शिवसैैनिकच आक्रमक झाल्याचे चित्र दिसले होते. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे यांनी खा. लोखंडे यांच्यासमवेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सेनेला बळ मिळाले आहे.निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना चालना देण्याव्यतिरिक्त लोखंडे यांच्याकडे सांगण्यासारखे काम नाही. लोखंडे यांच्याशिवाय सेनेकडून माजी मंत्री बबनराव घोलप (नाशिक) यांच्या कुटुंबीयातील सदस्य, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, साहित्यिक लहू कानडे यांच्या नावांचीही चर्चा आहे. माजी खासदार वाकचौरे हे प्रथम सेनेकडून निवडून आले. गतवेळी ते काँग्रेसमध्ये होते. नंतर भाजपात गेले. आता पुन्हा युती झाल्याने ते सेनेचा दरवाजा ठोठावत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड बन्सी सातपुते यांना उमेदवारी जाहीर केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून संतोष रोहम निवडणूक लढविणार आहेत. राखीव मतदारसंघ असल्याने विखे-थोरात-पिचड-गडाख या बड्या नेत्यांचा आशीर्वाद मिळेल का? याच आशेवर अनेक उमेदवार असतात. त्यामुळे काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना परावलंबी होण्याची वेळ आली आहे.सध्याची परिस्थितीबहुजन वंचित आघाडी, स्वाभिमानी, पीपल्स रिपब्लिकन काँग्रेस आघाडीत आल्यास हा मतदारसंघ त्यांच्यासाठी सोडला जाऊ शकतो. सुजय सेनेचा व राधाकृष्ण विखे काँग्रेसचा प्रचार करणार का, याची उत्सुकता आहे.तालुकानिहाय मेळाव्यांमध्ये खा. लोखंडे यांना शिवसैनिकांचा मोठा रोष पत्करावा लागला. ही चर्चा मातोश्रीपर्यंत पोहोचली. त्यामुळे लोखंडे यांची उमेदवारी जाहीर करण्याची कोणतीही घाई शिवसेना करणार नाही. कदाचित इथे ऐनवेळी उमेदवार बदलण्याची शक्यता आहे.अहमदनगर हा राष्ट्रवादी, तर शिर्डी मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. अहमदनगरची जागा राष्ट्रवादीलाच राहणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केल्याने शिर्डीची जागा आता काँग्रेसलाच राहील. मात्र ही जागा काँग्रेस लढविणार की घटक पक्ष हे अद्याप ठरलेले नाही. सुजय विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने शिर्डी मतदारसंघात शिवसेनेला बळ मिळणार आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९