श्रीरामपूर शहरात जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST2021-08-12T04:25:21+5:302021-08-12T04:25:21+5:30
विठ्ठल सदाफळ याचे मातोश्री बंगल्यात अज्ञात चोर घुसले. स्वयंपाक खोलीचा कडीकोंडा तोडून जिन्यातून बंगल्यात घुसले. बंगल्यात प्रा. सदाफुले, त्यांच्या ...

श्रीरामपूर शहरात जबरी चोरी
विठ्ठल सदाफळ याचे मातोश्री बंगल्यात अज्ञात चोर घुसले. स्वयंपाक खोलीचा कडीकोंडा तोडून जिन्यातून बंगल्यात घुसले. बंगल्यात प्रा. सदाफुले, त्यांच्या पत्नी मीरा सदाफळ, मुलगी भाग्यश्री, जयश्री व मुलगा सोहन असे पाच जण होते. यावेळी सदाफुलेंच्या पत्नीला जाग आली तर मुली व मुलगा जागा झाला. चोरट्यांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. दरोडेखोरांनी कपाटातील सामानाची उचकापाचक करून रोख रक्कम ३५ हजार व सुमारे ९ तोळे सोन्याचे दागिने घरातील लोकांनी स्वतःहून चोरट्यांना काढून दिल्या. कपाटात २ लॅपटॉप होते. जुना वापरता लॅपटॉप नेला. नवीन लॅपटॉप नेला नाही. मोबाईलदेखील नेला होता. जाताना बंगल्याच्या बाहेर टाकून गेले.
घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी दरोड्याच्या घटनास्थळी भेट देऊन दरोड्याचे प्रकाराची माहिती घेतली. प्रा. सदाफुले यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.