निपाणीवाडगाव येथे जबरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:40+5:302021-07-21T04:15:40+5:30

रात्री २ वाजेदरम्यान ही घटना घडली. दरोडेखोरांनी कटावणीच्या मदतीने दरावाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर आशिष दौंड हे जागे ...

Robbery at Nipaniwadgaon | निपाणीवाडगाव येथे जबरी चोरी

निपाणीवाडगाव येथे जबरी चोरी

रात्री २ वाजेदरम्यान ही घटना घडली. दरोडेखोरांनी कटावणीच्या मदतीने दरावाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर आशिष दौंड हे जागे झाले. दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत कुटुंबातील सदस्यांना धमकावले व ऐवज काढून घेतला. सामानाची उचकापाचक केली. घटनेनंतर दौंड यांनी निपाणी गावातील नातेवाइकांना फोन करून माहिती कळविली. ग्रामस्थांनी रात्री दरोडेखोरांचा शोध घेतला. मात्र, तोपर्यंत त्यांनी धूम ठोकली होती.

मंगळवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे, उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक संजय सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही दाखल झाले. श्वानाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, पावसामुळे ते माग काढू शकले नाही. ठसे तज्ज्ञांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासणीसाठी ठशांचे नमुने घेतले आहेत. शहर पोलीस ठाण्यात आशिष दौंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------

Web Title: Robbery at Nipaniwadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.