खोकर येथे जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:49+5:302021-06-19T04:14:49+5:30
श्रीरामपूर : तालुक्यातील भोकर येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी करून ३० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ५५ हजार रुपयांची ...

खोकर येथे जबरी चोरी
श्रीरामपूर : तालुक्यातील भोकर येथे चोरट्यांनी दोन ठिकाणी चोरी करून ३० तोळे सोन्याच्या दागिन्यांसह एक लाख ५५ हजार रुपयांची रोकड लांबविली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी माजी सरपंच लक्ष्मण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चव्हाण यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ३० तोळे सोने व एक लाख ४५ हजार रुपयांची रोकड लांबविली. चोरट्यांनी बँकेचे पासबुक, चेकबुक व इतर कागदपत्रांची उचकापाचक केली व चोरून नेले. चव्हाण कुटुंबीयांना मात्र कोणतीही इजा पोहोचविली नाही. चोरांनी घरातील बंदूक घरालगत झाडीमध्ये फेकून दिली. चोरीत बांगड्या, मंगळसूत्र अंगठ्या, चेन असा ऐवज लांबविण्यात आला. ट्रक्टर खरेदी करण्यासाठी चव्हाण यांनी घरामध्ये ही रोकड आणून ठेवली होती.
तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे यांनी घटनास्थळी पाहणी केली. यानंतर नगर येथून श्वान पथकही हजर झाले. हस्तरेषा तज्ञांचे पथक पाचारण करण्यात आले. पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे. दुसऱ्या एका घटनेत त्याच रात्री कारेगाव रस्त्यावरील रवींद्र कुसेकर यांच्या घराचा घराचा दरवाजा तोडून कपाटातील दहा हजार ४०० रुपये चोरांनी लांबविले.
--------